Saturday, May 4, 2024
Homeनगरमाजी खासदार तुकाराम गडाख यांचे निधन

माजी खासदार तुकाराम गडाख यांचे निधन

नेवासा (तालुका प्रतिनिधि)

नगर दक्षिणचे माजी माजी खासदार व शेवगाव-नेवासाचे माजी आमदार तुकाराम गंगाधर गडाख उर्फ भाऊ (वय ६९ वर्षे) यांचे निधन शुक्रवार (दि. २) रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास निधन झाले.

- Advertisement -

नेवासा तालुक्यातील पानसवाडी येथील मूळ रहिवाशी असलेले तुकाराम यांचा जन्म १ नोव्हेबर १९५३ सालचा आहे. १९८९ ते १९९४ त्यांनी अपक्ष शेवगाव-नेवासा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. तर २००४ ते २००९ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून दक्षिण लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांचे मागे पत्नी, एक मुलगा व दोन मूली असा परिवार आहे.

आज शनिवार दि.३ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता नेवासा तालुक्यातील पानसवाडी येथे त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. गडाख यांच्या निधनामुळे नेवासा तालुक्यावर शोककळा पसरली आहे. एक लढवय्या नेता म्हणून त्यांना राज्यात ओळखले जात होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या