Tuesday, May 7, 2024
Homeदेश विदेशपाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांचे निधन

पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांचे निधन

नवी दिल्ली | New Delhi

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेज मुशर्रफ (Pervez Musharraf) यांचे निधन झाल्याची माहिती पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी दिली आहे.

- Advertisement -

पाकिस्तानच्या (Pakistan) राजवटीचे लष्करीकरण करणारे मुशर्रफ यांनी २००१ ते २००८ या काळात पाकिस्तानचे राष्ट्रपती (President) म्हणून जबाबदारी सांभाळली होती. तसेच त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून देखील ते पदावर राहिले आहेत.

राहुरी, श्रीरामपूरच्या आकाशातून रात्रीच्या अंधारात नेमकं काय गेलं?…. नागरिकांनी अनुभवले अनोखे दृष्य

२०१६ पासून ते दुबई (Dubai) येथे स्थायिक झाले होते. त्यांच्यावर प्राणघातक हल्ले झाल्यामुळे त्यांना पाकिस्तान सोडावे लागले होते. त्यानंतर आज त्यांचे दुबईमधील रुग्णालयात निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर दुबईमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर उपचार सुरू असताना आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आजारापणामुळे त्यांना काही आठवड्यापुर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

एका लग्नाची जगावेगळी गोष्ट! नवरी पळाली भुर्रर्र…नवरा पाहतच राहिला

दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार, माजी लष्करप्रमुख आणि पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे रविवारी दीर्घ आजाराने UAE मधील अमेरिकन रुग्णालयात निधन झाले, असे पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे. त्यांनी 1998 ते 2001 पर्यंत पाकिस्तानचे 10 वे अध्यक्ष जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटी (Joint Chiefs of Staff Committee) (CJCSC) आणि 1998 ते 2007 पर्यंत 7 वे सर्वोच्च जनरल म्हणून काम केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या