मुंबई | Mumbai
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक व पर्यावरणवादी चळवळीतील लढवय्ये कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो (Francis Dibrito) यांचे आज (गुरुवार) पहाटे प्रदीर्घ आजाराने निधन (Passed Away) झाले. वसई (Vasai) येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८0 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्व आणि पर्यावरण चळवळीवर शोककळा पसरली आहे.
हे देखील वाचा : पुण्यात पावसाचा हाहाकार; अनेकांच्या घरांत शिरलं पाणी, नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू बोटी मागवल्या
गेल्या अनेक दिवसांपासून फादर फ्रान्सिस दिब्रिटो आजारी होते. त्यांच्यावर वसईतील जेलाडी येथील निवासस्थानीच उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच आज पहाटे त्यांचे निधन झाले.दुपारी साडेतीन वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी राहत्या घरी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर ४ वाजेपासून विरारच्या नंदाखाल येथील होली स्पिरिट चर्च येथे देखील त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी (funeral) ठेवण्यात येणार आहे. यानंतर याच चर्चमध्ये संध्याकाळी ६ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हे देखील वाचा : लॉरेन्स बिश्नोईच्या गँगनेच…; सलमान खानचा जबाबात धक्कादायक खुलासा
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा जन्म ४ डिसेंबर १९४२ या दिवशी वसई तालुक्यातील नंदाखाल गावी झाला. दिब्रिटो १९८३ ते २००७ या कालावधीत ‘सुवार्ता’ या प्रामुख्याने मराठी कॅथलिक समाजाशी संबंधित असलेल्या वार्तापत्राचे मुख्य संपादक होते. फ्रान्सिस दिब्रिटो यांचे शिक्षण नंदाखाल येथील संत जोसेफ मराठी हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर १९७२ या वर्षी त्यांनी कॅथलिक धर्मगुरुपदाची दीक्षा घेतली. त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी.ए.तर धर्मशास्त्रात एम.ए.केले आहे.
हे देखील वाचा : ठाकरे पिता-पुत्रांसह अजित पवारांना खोट्या प्रकरणांत अडकवण्यासाठी फडणवीसांचा दबाव; अनिल देशमुखांचे गंभीर आरोप
दरम्यान, फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मगुरु असले, तरी दिब्रिटो हे पर्यावरणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरुद्ध आवाज उठविणारे कार्यकर्ते आणि सुजाण, सजग आणि सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व आहे. ‘सुवार्ता’या मासिकाद्वारे त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे अनेक वेगवेगळे विषय मांडले आणि काही उपक्रमही राबवले. त्यामुळे हे मासिक केवळ ख्रिस्तीधर्मीयांसाठी न राहता मराठी साहित्यातही या मासिकाने स्वतंत्र ठसा उमटला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा