Tuesday, March 25, 2025
Homeनाशिकमाजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कुटुंबासह घेतले त्र्यंबकराजाचे दर्शन

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कुटुंबासह घेतले त्र्यंबकराजाचे दर्शन

त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar

देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Former President Ram Nath Kovind) यांनी आज त्र्यंबकेश्वर येथे सहकुटुंब भेट दिली. यावेळी त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन सपत्नीक पूजा केली. अलीकडेच माजी पंतप्रधान एचडी देवेगौड़ा यांनी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे भेट देऊन पूजा केली होती. त्यानंतर आज माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सहकुटुंब हजेरी लावत भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले.

- Advertisement -

यावेळी मंदिरात (Temple) पूजा पौरोहित्य विश्वस्त व पुरोहित मनोज थेटे व सहकारी यांनी करत कोविंद परिवाराला आशीर्वाद दिला. तर मंदिरातील दर्शनानंतर रामनाथ कोविंद यांनी माध्यमांशी संवाद साधताना देशाच्या व विश्वाच्या सुख समाधानासाठी प्रार्थना केल्याचे सांगत सर्व जनतेला व भाविकांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी त्र्यंबकेश्वर व ग्रामीण पोलिसांकडून (Trimbakeshwar and Rural Police) मंदिर परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर सुरक्षेचा भाग म्हणून जवळपास अर्धा तास मंदिराच्या सभा मंडपातील दर्शनार्थी भाविकांच्या रांगा थांबवण्यात आल्या होत्या.

दरम्यान, यावेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंदिराबाहेर येत नंदिकेश्वर मंदिराकडे रांग पाहून भाविकांना (Devotees) हात उंचावत अभिवादन केले,तर भाविकांनी देखील त्यांना प्रतिसाद दिला. तसेच त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त कैलास घुले विश्वस्त रूपाली भुतडा यांनी कोविंद यांचे स्वागत केले. यावेळी पुजारी अनिल तुंगार, तहसीलदार श्वेता संचेती यांच्य्यासह ट्रस्टचे अधिकारी उपस्थित होते. साधारणता २२ ते २३ वर्षांपूर्वी माजी उपराष्ट्रपती भैरोंसिंह शेखावत यांनी त्र्यंबकेश्वरला भेट दिली होती, त्यानंतर आज माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भेट दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...