सार्वमत
नवी दिल्ली – देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मंगळवारी त्यांची वैद्यकीय तपासणी झाली. त्यानंतर एम्सच्या डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्याचा निर्णय घेतला.
गेल्या रविवारी नवीन औषधांची रिक्शन झाल्यामुळे डॉ. मनमोहन सिंग यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. ताप आल्यामुळे त्यांची अधिक काळजी घेण्यात आली. तसेच, एम्सच्या डॉक्टरांची एक टीम त्यांची देखरेख करत होती. मंगळवारी डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तसंच या ठिकाणी त्यांची करोनाची चाचणी करण्यात आली होती. त्यांची करोना चाचणी निगेटिव्ह आल्याचं सांगण्यात आलं होतं.
दरम्यान, डॉ. मनमोहन सिंग हे हार्ट पेशंट आहेत. यापूर्वी दोन वेळा त्यांची बायपास सर्जरी झाली आहे. 1990 मध्ये पहिल्यांदा इंग्लंडमध्ये त्यांची पहिली बायपास सर्जरी झाली होती. त्यानंतर 2004 मध्ये त्यांची अँजिओप्लास्टीही करण्यात आली होती. 2009 साली एम्स डॉक्टरांनी त्यांची एक बायपास सर्जरी केली होती. त्याआधी दिल्लीत 2003 मध्ये जिओप्लास्टी करण्यात आली होती. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे सध्या राजस्थानमधून राज्यसभा सदस्य निवडून आले आहेत.