Monday, April 28, 2025
Homeदेश विदेशमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग एम्स रूग्णालयात दाखल

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग एम्स रूग्णालयात दाखल

सार्वमत

नवी दिल्ली – देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास अचानक छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून प्रकृतीबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

- Advertisement -

AIIMS च्या कार्डियक न्यूरो सेंटरमध्ये  त्यांना  दाखल कऱण्यात आलं आहे. माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते मनमोहन सिंग यांना हृदयाचा विकार आहे. सध्या 87 वर्षांचे असलेले मनमोहन सिंग यांनी युपीए सरकारच्या काळात सलग दोन टर्म पंतप्रधान पद भूषवलं आहे.

मनमोहन सिंग यांनी 2004 ते 2014 या काळात देशाच्या पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली. त्याआधी त्यांनी 1991 मध्ये नरसिंहा राव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून काम पाहिलं होतं. कोरोनामुळे सध्या उद्भवलेल्या स्थितीसाठी काँग्रेसनं एक समिती तयार केली आहे. त्याचं अध्यक्षपदही त्यांच्याकडेच आहे. डॉ. मनमोहन सिंग हे अर्थतज्ज्ञ आहेत. तसेच ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गवर्नर देखील होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २८ एप्रिल २०२५ – ही सामूहिक जबाबदारी

0
तापमानाच्या वाढत्या पार्‍याबरोबर राज्याच्या धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. राज्यात सुमारे तीन हजार छोटे-मोठे जल प्रकल्प आहेत. सद्यस्थितीत त्या प्रकल्पांमध्ये सुमारे छत्तीस टक्के...