Saturday, April 26, 2025
Homeदेश विदेशगोळीबारात इम्रान खान जखमी

गोळीबारात इम्रान खान जखमी

वजिराबाद |Vajirabad

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या लाँग मार्चमध्ये गुरुवारी एका व्यक्तीने गोळीबार केला. जियो न्यूजच्या वृत्तानुसार, या घटनेत इम्रान यांच्या उजव्या पायाला गोळी लागली आहे. ते जखमी असून, त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेत इम्रान यांच्या पाकिस्तान तहरिक ए इन्साफ पक्षाचे (पीटीआय) खासदार फैजल जावेद यांच्यासह त्यांचे 4 कार्यकर्ते जखमी झालेत. पोलिसांनी गोळीबार करणार्‍या व्यक्तीला अटक केली आहे.

- Advertisement -

डॉन न्यूजच्या वृत्तानुसार, पाकच्या पंजाब प्रांतातील वजिराबाद येथे ही घटना घडली. इम्रान उभ्या असणार्‍या कंटेनरजवळ गोळीबार झाला. इम्रान इस्माईलने सांगितले की, इम्रान खान यांच्या पायात 3 ते 4 गोळ्या लागल्या आहेत. हल्ला झाला होता तेव्हा मी त्याच्या बाजूलाच होतो. त्यांच्यावर एके-47 मधून फायरिंग करण्यात आली. हल्लेखोर त्यांच्या कंटेनरच्या अगदी जवळ होता.

दुसरीकडे, हल्लेखोराविषयी 2 गोष्टी उजेडात येत आहेत. ऋझ ने आपल्या सहयोगींचा दाखला देत हल्लेखोर ठार झाल्याचा दावा केला आहे. तर डॉन न्यूजने गोळीबार करणार्‍या व्यक्तीला सुरक्षा कर्मचार्‍यांनी अटक केल्याचे म्हटले आहे.

रॅलीत गोळी लागल्यानंतर जखमी झालेल्या इम्रान खान यांनी रुग्णालयात जाण्यापूर्वी समर्थकांचे हात हलवून अभिवादन केले. त्यानंतर सुरक्षा रक्षक व समर्थकांच्या घेराबंदीत त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले.

तो म्हणाला – अल्लाहने आपल्याला नवे आयुष्य दिले आहे. इंशाल्लाह आम्ही पुन्हा पुनरागमन करणार व आपला संघर्ष यापुढेही सुरू ठेवू.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या