नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या अगदी एका आठवड्यानंतर, मंगळवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. यात तिन्ही दलांचे वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्यासाठी लष्कराला मोकळीक दिल्याचे म्हटले जात आहे. या बैठकीनंतर आता केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची पुनर्रचना केली आहे. रिसर्च अॅण्ड अॅनालिसिस विंगचे माजी प्रमुख आलोक जोशी यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या मंडळात आणखी सहा सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीत माजी एअर कमांडर पी. एम. सिन्हा, माजी लेफ्टनंट जनरल ए. के. सिंह, रिअर अॅडमिरल मोंटी खन्ना, राजीव रंजन वर्मांसह लष्करी व भारतीय पोलीस सेवेतील निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. राजीव रंजन वर्मा आणि मनमोहन सिंग हे भारतीय पोलिस सेवेतील दोन निवृत्त सदस्य आहेत. सात सदस्यांच्या मंडळात बी. वेंकटेश वर्मा हे निवृत्त आयएफएस आहेत.
गेल्या आठवड्यात पहलगाम येथील बैसरन व्हॅली येथे दहशतवादी हल्ला झाला होता त्यात २६ पर्यटक ठार झाले. राजीव रंजन वर्मा आणि मनमोहन सिंग हे भारतीय पोलिस सेवेतील दोन निवृत्त सदस्य आहेत. सात सदस्यांच्या मंडळात बी. वेंकटेश वर्मा हे निवृत्त आयएफएस आहेत.
बैठकांचा धडाका
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्या झाल्यानंतर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पहलगाममध्ये एका नेपाळी नागरिकासह २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावलेली सुरक्षा मंत्रिमंडळ समितीची बैठक आज दुपारी संपली. सीसीएस बैठकीसोबत, पंतप्रधानांच्या निवासस्थानी राजकीय व्यवहार मंत्रिमंडळ समिती आणि आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समिती या दोन अतिरिक्त समितीच्या बैठका बोलावण्यात आल्या आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा