श्रीलंका । Shrilanka
श्रीलंकेमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. श्रीलंका क्रिकेट संघाचा ४१ वर्षीय माजी क्रिकेटपटू धम्मिका निरोशानाची राहत्या घरात शिरून अज्ञात इसमाने हत्या केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निरोशन आपल्या राहत्या घरी दोन मुले आणि पत्नीसोबत असताना हा प्रकार घडला. गोळीबाराचा हेतू अद्याप अस्पष्ट असून संशयित आरोपी अद्याप फरार आहे. आंबालनगोडा पोलीस गुन्हेगाराला पकडण्यासाठी आणि गुन्ह्याचे कारण शोधण्यासाठी कसून तपास करत आहेत.
हे देखील वाचा : “बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे…”; मुख्यमंत्र्यांनी घातले पांडुरंगाच्या चरणी साकडे
निरोशनने १९ वर्षांखालील श्रीलंका क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २००० मध्ये सिंगापूर विरूध्द सामन्याने त्याने आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली.१९ वर्षांखालील संघाकडून कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळले असून, १० सामन्यात संघाचे कर्णधारपद भूषविले आहे.
२२ फेब्रुवारी १९८३ रोजी निरोशनचा जन्म झाला. प्रथम श्रेणी सामन्यात पदार्पण करण्यापूर्वी त्याने श्रीलंकेच्या शालेय एकादश संघाचे प्रतिनिधित्व केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने चिलावा मरिन्स क्रिकेट क्लब आणि गॅले क्रिकेट क्लब कडून खेळला.
गोलंदाज म्हणून त्याची कामगिरी प्रथम श्रेणी, लिस्ट ए तसेच १९ वर्षांखालील सामन्यात ३० च्या खाली होती. प्रथम श्रेणी सामन्यात १२ सामन्यात २६९ धावा केल्या असून,१९ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच लिस्ट ए सामन्यात ८ सामन्यात ५ विकेट्स घेतल्या आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
सलिल परांजपे नाशिक.