Friday, May 31, 2024
Homeमुख्य बातम्याधक्कादायक! माजी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भावाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

धक्कादायक! माजी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भावाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

मुंबई | Mumbai

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर (Shivraj Patil Chakurkar) यांच्या चुलत भावाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली…

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर पाटील चाकूरकर (वय ८१ वर्षे) (Chandrasekhar Patil Chakurkar) असे आत्महत्या करणाऱ्या चाकूरकरांच्या भावाचे नाव आहे. चंद्रशेखर चाकूरकर हे लातूर शहरातील (Latur City) आदर्श कॉलनी भागात राहत होते. चंद्रशेखर चाकूरकर हे दररोज सकाळी फिरायला घराबाहेर पडायचे. त्यानंतर ते स्वताच्या घरी जाण्याऐवजी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरी जात होते. तिथे चहा पाणी झाल्यावर तेथील पेपर चंद्रशेखर चाकूरकर वाचत बसायचे आणि नंतर बाजूला असलेल्या स्वतःच्या घरी जात होते.

तहसील कार्यालयातील वाहनचालक दीड लाखांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

आज सकाळी नेहमीप्रमाणे फिरून आल्यावर चंद्रशेखर चाकूरकर हे बंधू शिवराज चाकूरकर यांच्या घरी आले. घरात आल्यावर शैलेश पाटील यांनी त्यांना चहा घ्या मी आवरून येतो, असे सांगितले. मात्र काही वेळाने गोळीचा आवाज आल्याने घरातील नोकर आणि शैलेश पाटील हे धावत हॉलमध्ये आले. त्यावेळी त्यांना तिथे चंद्रशेखर पाटील चाकूरकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून

काश्मिरी पंडितांच्या हत्या प्रकरणावरून राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले…

दरम्यान, त्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच चंद्रशेखर चाकूरकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. तर विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी परिचित असलेल्या अनेकांना ‘गूड बाय’ असा टेक्स मॅसेज देखील केला होता.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या