Friday, January 23, 2026
Homeदेश विदेशकाँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकरांच वयाच्या ९०...

काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकरांच वयाच्या ९० व्या वर्षी निधन

लातूर | Latur
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे नुकतेच निधन झाले आहे. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठावड्यातील लातूर येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात एक मुले, मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

शिवराज पाटील चाकूरकर यांनी मराठवाड्यातील मागास भागातून येऊन काँग्रेसमध्ये केंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल पदापर्यंत मजल मारली होती. 35 ते 40 वर्ष त्यांनी खासदार म्हणून काम केले. लातूर जिल्ह्यात शिवराज पाटील चाकूरकर यांची राजकीय कारकीर्द घडली. विधिज्ञ म्हणून युक्तीवाद करणाऱ्या शिवराज पाटील चाकुरकर यांनी लातूरच्या नगरपालिकेच्या राजकारणापासून सुरुवात केली. पण ते रमले मात्र दिल्लीमध्ये. १९८० मध्ये ते लातूर मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले आणि त्यानंतर १९९९ पर्यंत सलग सात निवडणुका जिंकत लोकसभेतील एक प्रभावी नेता म्हणून उदयास आले.

- Advertisement -

लातूर जिल्ह्याचा विकास कसा होईल, यासाठी चाकूरकर कायम आग्रही असायचे. लातूर जिल्ह्यानेही त्यांना भरभरुन प्रेम केले. लातूर जिल्ह्याने कायम काँग्रेस सोबत राहून चाकूरकर आणि काँग्रेसला मजबूत केले. चाकूरकर यांच्या निधनाने लातूर जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे.

YouTube video player

इंदिरा गांधी, राजीव गांधींच्या मंत्रिमंडळात मोठी पदं भुषवली
इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री, वाणिज्य, विज्ञान-तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स व अवकाश अशा महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. १९९१ ते १९९६ या काळात ते देशाचे १० वे लोकसभा अध्यक्ष होते. लोकसभेचे आधुनिकीकरण, संगणकीकरण, संसदेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण, नवे ग्रंथालय इमारत यांसारख्या उपक्रमांना त्यांनी गती दिली.

सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षातही त्यांनी जाहीरनामा समितीचे अध्यक्षपदासह अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. २००४ मध्ये निवडणूक हरूनही त्यांच्यावर विश्वास ठेवत केंद्रातील गृहमंत्रीपद देण्यात आले होते. मात्र २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेतील त्रुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी ३० नोव्हेंबर २००८ रोजी राजीनामा दिला.

सुमारे पाच दशकांचा संसदीय आणि प्रशासकीय अनुभव, विविध मंत्रालयातील कामकाज आणि लोकसभा अध्यक्ष म्हणून केलेले योगदान यामुळे शिवराज पाटील हे भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे आणि अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्त्व मानले जात. काँग्रेस नेत्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या चर्चांमध्ये ते सहभागी असत. त्यामुळे कॉग्रेसच्या किचन कॅबिनेटमध्ये ते होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात नेहमी असे. गेल्या काही वर्षापासून ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले होते. त्यांनी गीतेचा अभ्यास केला. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभूत्त्व होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

अत्याचार

त्या नराधमाला पाहताच चिमुकली घाबरुन पालकांच्या मागे लपली; बदलापूरात पुन्हा चिमुकलीवर...

0
बदलापूर | Badlapurबदलापूरमध्ये पुन्हा एकदा शाळेतील लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका चार वर्षांच्या मुलीसोबत शाळेच्या बसमध्ये हे कृत्य...