Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्यामाजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन

माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन

दिल्ली | Delhi

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांचं वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले आहे.

- Advertisement -

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्ये त्यांनी १९९९ ते २००४च्या दरम्यान संरक्षण, विदेश आणि अर्थ मंत्रालयाचा कारभार सांभाळला. २०१४मध्ये भाजपनं सिंह यांना बाडमेर मंतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारलं होतं. त्यावेळी नाराज झालेल्या जसवंत सिंह यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेत अपक्ष निवडणुक लढले. मात्र, त्या निवडणुकीत त्यांना हार पत्करावी लागली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक..

मोदींनी ट्वटिमध्ये म्हटले की, जसवंत सिंह यांनी संपूर्ण मन लावून देशाची सेवा केली. अगोदर एका सैनिकाच्या रुपात आणि नंतर राजकारणातील आपल्या प्रदीर्घ कार्यकाळाद्वारे. अटलजींच्या सरकारच्या कार्यकाळात त्यांनी महत्वपूर्ण विभागांचे काम पाहिले आणि अर्थ, रक्षा व परराष्ट्र मुद्यांची जगभरात एक मजबूत छाप सोडली. त्यांच्या निधनाने दुःखी आहे.” तसेच “राजकारण आणि समाजातील विविध मुद्यांवरील अद्वितीय दृष्टिकोनासाठी जसवंत सिंह यांची आठवण काढली जाईल. त्यांनी भाजपाला बळकट करण्यासाठी देखील मोठे योगदान दिले. मी सदैव आमच्यात झालेला संवाद स्मरणात ठेवेल. त्यांचा परिवार व समर्थकांच्या दुःखात मी सहभागी आहे”

- Advertisment -

ताज्या बातम्या