Saturday, October 12, 2024
Homeमुख्य बातम्याकरोनाकाळात राज्य सरकारची कामगिरी लांच्छनास्पद; माजी मंत्र्यांचा घणाघात

करोनाकाळात राज्य सरकारची कामगिरी लांच्छनास्पद; माजी मंत्र्यांचा घणाघात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

करोनाकाळात (Corona) महाराष्ट शासनाची (Maharashtra Government) कामगिरी अतिशय लांच्छनास्पद राहिली असून केंद्र सरकारने (Central Government) मदत केली नसती तर राज्यातील जनतेची अवस्था केविलवाणी झाली असती, असा आरोप माजी संरक्षण राज्यमंत्री खा. सुभाष भामरे (Subhash Bhamare) यांनी आज येथे केला…

- Advertisement -

भारतीय जनता पक्षातर्फे (BJP) येत्या 28 नोव्हेंबरपर्यंत ठाकरे सरकारच्या (Thackeray government) अपयशाचा पाढा वाचला जात आहे. त्यानिमित्त आज डॉ. भामरे यांनी वसंतस्मृतीत पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले की, दोन वर्षात करोना महामारीमुळे अतिशय गंभीर परिस्थिती होती. मात्र मोदी सरकारने अतिशय चांगल्या प्रकारे देशाची अर्थव्यवस्था सांभाळली. शेती व लघु उद्योगाला भरघोस मदत करुन अर्थव्यवस्था पुर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला.

सहा हजार कोटी आजही पडून

गरीब जनतेला अन्न, धान्यापासून पैशांची मदत केली. मात्र या काळात महाराष्टात सर्वाधिक मृत्यू झाले. त्याला राज्य सरकारचा ढिसाळ कारभार कारणीभूत आहे. त्यांनी जमविलेल्या निधीपैकी केवळ 25 ट्क्के निधी खर्च केला. सहा हजार कोटी आजदेखील पडून आहे.

या काळात केंद्रा शासनाने मदतीचा हात दिला नसता तर राज्यातील जनतेला या सरकारने वार्‍यावर सोडले असते. कारण दोन वर्षात मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याची स्पर्धाच जणू सुरु होती. अनकांची लुट या काळात झाली. मात्र त्यावर नियंत्रण ठेवता आले नाही, असा आरेप त्यांनी केला. यावेळी शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या