दिंडोरी । प्रतिनिधी Dindori
अज्ञात कारणावरुन घरातून कोणालाही काहीही न सांगता बेपत्ता झालेल्या 31 वर्षीय युवकाचा मृतदेह ओझरखेड धरणाजवळील शिवारात कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
- Advertisement -
घटनास्थळी वणी पोलिसांनी येऊन पंचनामा करीत मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. सागर बाळू मुळाणे (रा. पिंपळगाव धुम, ता. दिंडोरी) हा युवक दि. 13 एप्रिल पासून घरातून कोणालाही काहीही न सांगता बेपत्ता झाला होता. कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही.
दरम्यान, ओझरखेड धरणाजवळील शिवारात कुजलेल्या मृतदेहाची खातरजमा करताच तो सागर असल्याचे निष्पन्न झाले. अकस्मात मृत्यूची नोंद वणी पोलिसांत करण्यात आली आहे.