शिरपूर – तालुका पोलिसांनी आज पुन्हा दमदार कामगिरी केली आहे. सुळे ते रोहिणी गाव रस्त्यावर कारमधून साडेचार लाखांचा 80 किलो सुखा गांजा व चार लाखांची कार असा एकुण 8 लाख 42 हजार रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एकाविरूध्द शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे काल दि. 2 रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने व सपोनि अभिषेक पाटील यांच्यासह पथकाने ही कारवाई करण्यात आली. सुळे ते रोहिणी गावाचे रस्त्यावर सापळा लावून रोहिणी गावाकडून येणार्या कारला (क्र.एमएच 39 डी 1380) थांबविले. चालकाने भाईदास राजू पावरा (वय 23 रा. महादेव दोंदवाडा, शिरपूर) असे नाव सांगितले. कारची तपासणी केली असता डिक्कीत 4 लाख 42 हजार 750 रुपये किंमतीचा 80 किलो 500 ग्रॅम वजनाच्या सुका गांजा मिळून आला. गांजा व चार लाखांचे वाहन असा एकूण 8 लाख 42 हजार 750 रुपयाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोहेकॉ हेमंत पाटील यांच्या एकाविरूध्दे एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास दीपक वारे हे करीत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने, सपोनि अभिषेक पाटील, पोसई खैरनार, पोसई वारे, देविदास पवार, हेमंत पाटील, संजीव जाधव, योगेश मोरे, योगेश दाभाडे, राजीव गीते, क्यूआरटी पथकाचे पोलीस नाईक सांगळे, बोरसे, मोरे, पाठक, चौधरी, जाधव, आढारी, निकम, महाले, गांगुर्डे, पाटील, प्रमोद पाटील, दुरबुडे व चालक फारुकी, सुर्यवंशी यांनी ही कारवाई केली.