Saturday, April 26, 2025
Homeक्राईमNashik Sinnar News : साडेचार वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून अत्याचार; आरोपी ...

Nashik Sinnar News : साडेचार वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून अत्याचार; आरोपी ताब्यात

वावी पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

वावी | वार्ताहर | Vavi

राज्यातील बदलापुमध्ये (Badlapur) चार वर्षांच्या चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) मऱ्हळ येथे एका साडे चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात (Vavi Police Station) पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : पंचवटीत पोलिस पुत्राचा निर्घृणपणे खून

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवार (दि.१९) रोजी सायंकाळी सदरचा प्रकार घडला असून फिर्यादीनुसार तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी मऱ्हळ (Maharl) येथील आरोपी नामे टिल्लू उर्फ प्रकाश एकनाथ अहिरे (वय २६) यास पोलिसांनी (Police) तत्काळ अटक (Arrested) करून ताब्यात घेतले आहे.

हे देखील वाचा : Badlapur School Case : लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी कारवाई; देवेंद्र फडणवीसांनी दिले ‘हे’ आदेश

तसेच त्याच्याविरोधात पोस्को (Posco) अंतर्गत गुन्हा नं.३५१ / २०२४ भांदवी नुसार १३७ (२),६४(१),६५ (२) प्रमाणे बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम ४,८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याबाबत अधिक तपास सहा.पोलीस निरीक्षक संदेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर करत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पहलगाम

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याप्रकरणी TRF संघटनेचा घुमजाव; आधी हल्ल्याची जबाबदारी स्विकारली...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ पर्यटक ठार झाले. तर जे स्थानिक मदतीसाठी धावले, त्यांनाही...