Friday, May 24, 2024
Homeनाशिकशिक्षण उपसंचालकांकडून चार मान्यता रद्द

शिक्षण उपसंचालकांकडून चार मान्यता रद्द

नाशिक | प्रतिनिधी

नूतन शारदा सांस्कृतिक विकास मंडळ संचालित सातपूर येथील शारदा प्राथमिक विद्या मंदिरात बोगस ठरावाद्वारे शिक्षक भरती कलेल्या चार मान्यता शिक्षण उपसंचालक डॉ बी. बी. चव्हाण यांनी अखेर रद्द कल्या आहेत. नूतन शारदा सांस्कृतिक विकास मंडळ संचालित सातपूर येथील शारदा प्राथमिक विद्या मंदिरात बोगस ठरावाद्वारे शिक्षक भरती कलेले गोकुळ हिरे, बारकू टकले, विशाल भोईर, जयश्री हाडोळे यांची मान्यता आदेश कायमस्वरूपी रद्द केले. त्यांचे शालार्थ आयडी गोठवण्याच्या सुचना त्यांनी दिल्या आहेत.

- Advertisement -

बोगस ठरावाद्वारे शिक्षक भरती केल्याप्रकरणी २०२० मध्ये जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या संदर्भात वेळोवेळी सुनावण्या होऊन चौकशी अहवालामध्ये बोगस ठराव असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेचा मुख्य सूत्रधार रवी सरकटे, गोकुळ हिरे हे दोन असल्याचे निष्पन्न झाले.

याबाबत शिक्षण उपसंचालक यांनी घेतलेल्या सुनावणी दरम्यान संस्थाचालकांनी कोणतेही पुरावे सादर केले नाही. वैशाली बोरवे आणि जयश्री हाडोळे यांच्या नियुक्ती आदेशासोबत जोडलेल्या ठरावावर भगवान ताजणे हे नाव अनुमोदक म्हणून नमूद करण्यात आले. याबाबत अधिक चौकशी केली असता त्या दरम्यान भगवान ताजणे हे नाव संस्थेच्या रेकार्डवर नाही. तसेच सदरचा ठराव देखील संस्थेच्या दप्तरी नाही.

सन २००४ मध्ये गोकुळ हिरे यांची कायम वैयक्तिक मान्यता मनपा प्रशासनाने रद्द केली होती. याबाबत संस्था चालकांनी कोणताही प्रस्ताव दिलेला नसताना गोकुळ हिरे यांच्या अर्जावरून २००५ मध्ये त्यांचा मान्यता आदेश काढण्यात आला. ३ जुलै २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडील पत्रानुसार शिक्षण उपसंचालक कार्यालयाने तीन वेळा सुनावण्या घेतल्या. रवी सरकटे, लता सरकटे या मायलेकांनी शिक्षकांना वाचविण्याचा प्रयत्न केला.

जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे केलेल्या तक्रार अर्जातील सर्व मुद्दे खरे आहेत. त्यामध्ये तथ्य आढळल्याचा स्पष्ट अभिप्राय शिक्षण उपसंचालकांनी २ नोव्हेबर २०२३ च्या इतिवृत्तामधे दिला आहे. या गंभीर प्रकरणी अशी सामाजिक कार्यकर्ते बापू पुजारी यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा शासकिय घोटाळा उघडकीला आला आहे.

प्रवीण पाटील यांचा पदभार आज काढणार

दरम्यान बोगस मान्यते प्रकरणी दोन गुन्हे दाखल असलेले जिल्हा परीषद माध्यमीक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांच्याकडील पदभार काढण्याबाबत जिल्हा परीषद प्रशासनाने कंबर कसली आहे. त्याबाबतचा अहवाल आज तयार झाला असुन उद्या जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधीकारी अशिमा मित्तल यांनी त्यावर स्वाक्षर करताच पदभार काढण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या