Sunday, May 18, 2025
Homeधुळेसिनेस्टाईल पाठलाग करत गावठी कट्टे नेणार्‍या तुळजापुरच्या चौघांना अटक

सिनेस्टाईल पाठलाग करत गावठी कट्टे नेणार्‍या तुळजापुरच्या चौघांना अटक

धुळे – प्रतिनिधी dhule

- Advertisement -

शिरपूर (shirpur) तालुका पोलिसांनी (police) सिनेस्टाईल (Cinestyle) पाठलाग करीत गावठी कट्टे घेवून जाणार्‍या कारमधील चौघांना पकडले. चौघे तुळजापूर तालुक्यातील (Tuljapur Taluka) असून त्यांच्याकडून कारसह दोन गावठी कट्टे, चार जिवंत काडतूस असा एकुण ८ लाख ८२ हजारांचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला.

पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील (Superintendent of Police Pravin Kumar Patil) यांनी पत्रपरिषदेत पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक केले.

रोहीणी भोईटी गावाकडुन शिरपुरच्या दिशेने कारमधून (क्र.एमएच १३ बीजे ९००१) चार इसम गावठी कट्टे (अग्नी शस्त्रे) घेवुन जात असल्याची गुप्त माहिती काल दुपारी सपोनि सुरेश शिरसाठ यांना मिळाली. त्यांनी तत्काळ पथकाला कारवाईसाठी रवाना केले. पथक रोहीणी भोईटी गावाकडे जात असतांना समोरुन संशयीत कार येतांना दिसली. पोलिसांनी वाहनाला थांबण्याचा इशारा केला असता वाहन चालकाने वाहन न थांबवता आणखी जोरात शिरपुरच्या दिशेने नेले. पथकानेही कारचा सिनेस्टाईल पाठलाग करत चिलारे गावाजवळ वाहन अडवुन थांबविले.

वाहनातील बसलेल्या इसमांची हालचाल संशयास्पद वाटल्याने पथकाने चौघांना ताब्यात घेतले. राहुल विष्णु शिंदे (वय २० रा.मातंगनगर, शुक्रवार पेठ, तुळजापुर जि. उस्मानाबाद), अमोल रविंद्र कोरडे (वय २२ रा. आनंदनगर, हुडको ता.तुळजापुर), ओमकार गणेश रणदिवे (वय २१, रा.जिजामाता हुडको, तुळजापुर) व सुरज महताब शेख (वय २५ रा. आरळी (बु) ता.तुळजापुर) अशी चौघांनी त्यांची नावे सांगितली.

गाडीची तपासणी केली असता गाडीच्या गिअर दांडीजवळ असलेल्या फायबर पार्टचे आडोश्यामध्ये लपवुन ठेवलेल्या २ पिस्टल मॅगझीनसह ४ जिवंत काडतुस मिळुन आल्या. त्यांच्याकडून ५० हजार रुपये किंमतीच्या दोन गावठी बनावटीच्या पिस्टल मॅगझीनसह, २ हजार रुपये किंमतीच्या चार जिवंत काडतुस व ८ हजार रुपये किंमतीची एक कार असा एकुण ८ लाख ५२ हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव (Upper Superintendent of Police Prashant Bachhav), उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि सुरेश शिरसाठ, पोसई संदिप पाटील, भिकाजी पाटील, पोहेकॉ संजय सुर्यवंशी, पोना संदिप पाटील, पोकॉ संजय भोई, कृष्णा पावरा, संतोष पाटील, मुकेश पावरा यांच्या पथकाने केली. पोना संदिप ठाकरे यांच्या फिर्यादी चौघांवर आर्म ऍक्ट कलम मुं. पो. का. कलम ३/२५ चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई भिकाजी पाटील करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पावसाची आकडेवारी चार दिवसांपासून गायब

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गेल्या आठ दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात भाग बदलत अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. अनेक तालुक्यात वादळासोबत जोरदार पर्जन्यवृष्टी झालेली आहे. मात्र, कोणत्या तालुक्यात...