Friday, June 21, 2024
Homeनाशिकभीषण अपघात! टॉवर वॅगन ट्रेनच्या धडकेत चार कर्मचारी ठार

भीषण अपघात! टॉवर वॅगन ट्रेनच्या धडकेत चार कर्मचारी ठार

लासलगाव | प्रतिनिधी | Lasalgaon

- Advertisement -

लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ टॉवर वॅगेन ट्रेनने चार कर्मचाऱ्यांना उडवल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात चारही कामगारांचा मृत्यू झाला आहे…

आज पहाटे 5.44 वाजेच्या दरम्यान लासलगाव-उगाव रेल्वे स्टेशन जवळ हा भीषण अपघात झाला.

अपघातात मृत्यू झालेले सर्व कामगार गँगमन होते. टॉवर (लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन) रॉग डायव्हरशने लासलगाव बाजूने उगावकडे जात होते.

पोल नंबर 15 ते 17 मध्ये ट्रॅक मेंटन (ब्लॉक तयारी) करण्याचे काम सुरू होते. हे काम ट्रॅक मेंटेनर कर्मचारी काम करत असतांना त्यांना रेल्वे लाईनची मेंटनेस करणाऱ्या टॅावरने धडक दिली.

या अपघातात कर्मचाऱ्यांना जबर मार लागण्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मृतांची नावे पुढीलप्रमाणे :

1) संतोष भाऊराव केदारे (38).

2) दिनेश सहादु दराडे (35)

3) कृष्णा आत्मराम अहिरे (40)

4) संतोष सुखदेव शिरसाठ (38)

दरम्यान, या घटनेविरोधात व चालकाविरोधात संतप्त रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल रोको आंदोलन सुरू केले आहे. कर्मचाऱ्यांनी रेल्वे गाड्या रोखून धरल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. मात्र, 20 मिनिटानंतर गोदावरी एक्सप्रेस रवाना करण्यात आली. त्यानंतर पुन्हा कर्मचाऱ्यांनी रेल रोको आंदोलन सुरू केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या