Friday, March 28, 2025
Homeजळगावहतनूर धरणाचे चार दरवाजे उघडले

हतनूर धरणाचे चार दरवाजे उघडले

वरणगांव फॅक्टरी (वार्ताहर ) Varangaon Factory

भुसावळ तालुक्यातील अतिशय महत्वाच्या व मोठ्या असलेल्या तापी नदीवरील (Tapi river) हतनूर धरणाचे (Hatnur dam)चार दरवाजे (Four gates) अर्धा मीटरने उघडण्यात (opened) आले असल्याची माहिती पाटबंधारे अभियंता एस जी चौधरी (Irrigation Engineer S. G. Chaudhary) यांनी दिली आहे .

- Advertisement -

विदर्भ परिसरात पाऊस (Rain in Vidarbha area) झाल्याने पुर्णा नदीच्या (Purna river) पाणलोट क्षेत्रा (catchment area) पाण्याची पातळी वाढली असून हतनूर धरणात सुद्धा जलसाठा वाढल्याने (Increased water reserves) धरणाचे चार दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले असल्याची व ३९९० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू (Discharge of water) आहे अशी माहिती चौधरी यांनी दिली आहे .
येणाऱ्या काळात पूर परिस्थिती लक्षात घेता धरणाच्या सर्व दरवाज्यांचे ऑईलिंग व मेंटेनन्स चे कामे तपासणी पूर्ण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले .

तापी नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा (Warning) सुद्धा देण्यात आला असुन पाण्याचा विसर्ग वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार व पाण्याची पातळी पाहून सोडण्यात येईल असेही त्यांनी दै देशदूत शी बोलतांना सांगितले .

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Immigration and Foreigners Bill 2025: भारत देश धर्मशाळा नाही! इथे अशांतता...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiकोणीही वाटेल तेव्हा भारतात येऊन राहायला, हा देश धर्मशाळा नाही. व्यापार, शिक्षण व संशोधनासाठी येणाऱ्या लोकांचे स्वागत आहे. मात्र,...