शेगाव – प्रतिनिधी
शेगाव-खामगाव रोडवरील भीषण अपघाताची घटना ताजी असतानाच आज सकाळी पुन्हा एक अपघाताची दुर्दैवी घटना समोर आली आहे. खामगाव-नांदुरा रोडवरील आमसरी फाट्याजवळ विटांचे मेटाडोर व मध्य प्रदेश परिवहन मंडळाच्या बसचा भीषण अपघात होऊन चौघे ठार झाले असून २० प्रवाशी जखमी झाले आहेत. यातील सहा जणांची प्रकृती गंभीर आहे.
जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथून विटा भरून मेटाडोर (क्र.एम एच २८ बीबी २९) हे नांदुऱ्याच्या दिशेने भरधाव वेगाने निघाले होते. दरम्यान चिखली आमसरी नजीक समोरून येणाऱ्या मध्यप्रदेश परिवहन महामंडळाच्या बस (क्र. एमपी ६८ झेडसी ५९३९) सोबत सदर मेटाडोरची सामोरा समोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात मेटाडोर मधील तिघे मृत्यू झाला. तर बस मधील २० प्रवाशी जखमी झाले. यावेळी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बसमधील जखमींना बाहेर काढले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले सर्व जखमींना तातडीने खामगाव सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. जखमपैिकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले आहे. इतर जखमीवर खामगाव येथील रुणालयात उपचार सुरू आहेत. याबाचत स्थानिकाने दिलेल्या माहितीनुसार विटांची वाहतूक करणारा मेटाडोर गैंग साइडने जात होता. यामुळेच हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. वृत्तलिहेपर्यंत पुढील कारवाई सुरू होती.
अपघातातील मृतांची नावे – या भीषण अपघातात विटांच्या मेटाडोर मधील चालक पातोळ्या मानसिंग भेवड्या (३५) रा.नांगरटी पो.धानोरा, महासिद्ध प्रेमसिंग धारवे (३०) रा.कोलोरी बन्हाणपूर, बळीराम कोतवाल (३८) रा.बन्हाणपूर या तिघांचा मृत्यू झाला असून बस मधील एकाचा देखील मृत्यू झाला आहे.
जखमींची नाव – या अपघातात शंकर पिना जानू जटाळे रा.टाकणार, ज्ञानेश्वरी प्रल्हाद कळंब रा.अकोला, धीरज सेवनात धंजय ज्योती धीरज पंजय रा.अकोला, वसीम शेख बशीर रा.ब-हाणपूर, बबीता संतोष भोजने रा.खामगाव, बिमल सुरेश मिश्रा रा.खामगाव, समाधान श्रीकृष्ण बोरे रा.आडोल, श्यामलाल बाबुलाल काजगर, उषा यादव, ऐश्वर्या प्रकाश चव्हाण, वैष्णवी रमेश अवचार, गजानन नामदेव यादव, शैलजा रवींद्र शिंदे, समृद्धी रवींद्र शिंदे, ज्योती संजय गोसावी रा.नेर हे जखमी झाले आहेत.