Saturday, April 26, 2025
Homeनाशिकपेठरोडवर साडेचार लाखांचा गुटखा पकडला; गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई

पेठरोडवर साडेचार लाखांचा गुटखा पकडला; गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई

नाशिक | प्रतिनिधी 

अवैध गुटखा विक्रीच्या तयारीत असलेल्या वाहनावर शहरातील पेठरोडवरील दत्तनगर येथे आज दुपारी छापा टाकून साडेचार लाखाच्या गुटख्यासह 10 लाख 50 हजार रूपयांचा मुद्देमाल शहर पोलीसांनी जप्त केला आहे.  जैद सलाउद्दीन शेख(33, रा. निळकंठ अर्पा. पाथर्डीफाटा) व समीर नसरूद्दीन खान (22, रा. झिनीत नगर, वडाळा गाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

- Advertisement -

गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक सचीन खैरनार व त्यांचे पथक गस्त घालत असताना पोलीस नाईक शांताराम महाले यांना खबर्‍याने पठेराडेवर अवैध गुटखा विक्रीच्या तयारीत पिकअप वाहन असल्याची माहिती दिली.

याबाबत वरिष्ठांना कळवल्यानंतर पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा वाघ, सहायक निरिक्षक सचीन खैरनार, महेश कुलकर्णी, कर्मचारी पोपट कारवाळ, वसंत पांडव, प्रविण कोकाटे, येवाजी महाले, अनिल दिघोळे, असिफ तांबोळी, दिलीप मोंढे, विशाल काठे, मनोज डोंगरे यांच्या तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने दत्तनगर येथे पाटाच्या बाजुला सापळा रचला होता.

निर्धारेत वेळत संशयित पिकअप वाहन येताच पथकाने छापा मारून तपासणी केली असता त्यामध्ये 3 लाख 60 हजार रूपयांचा आरबी रंगबाज पान मसाल्याच्या 3 हजार पाकिट (15 गोणी) तर बारबी झेड च्युंविंग टोबॅको तीन हजार पाकिट (15 गोण्या) असा मुद्देमाल आढळून आला.

तसेच 6 लाखाचे पिकअप वाहनही पोलीसांनी जप्त केले. असा एकुण 10 लाख 50 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सांत्वन

0
पुणे । प्रतिनिधी Pune जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या पर्यटकांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...