Saturday, April 26, 2025
Homeधुळेधुळे ; विवाहितेसह चौघांनी घेतला गळफास

धुळे ; विवाहितेसह चौघांनी घेतला गळफास

धुळे – प्रतिनिधी dhule

जिल्ह्यात विविध घटनेत विवाहितेसह चार जणांनी गळफास घेवून आत्महत्या केली आहे. याबाबत त्या-त्या पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

- Advertisement -

इमलाबाई कैलास ब्राम्हणे (वय 19 रा. इनिइकीता, सेंधवा जि.बडवाणी) या विवाहितेने दि.22 रोजी सायंकाळी माहेरी बोरमडी भोईटी (ता.शिरपूर) शिवारातील शेतात आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. तिला पती कैलास ब्राम्हणे याने कॉटेल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करीत मृत घोषित केले. याबाबत शिरपूर तालुका पोलिसात नोंद झाली आहे.

शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील रहिवासी परेश पांडुरंग निकम (वय 42) यांनी लिव्हरच्या आजाराला कंटाळून घराच्या ओट्यावरच साडीने गळफास घेतला. दि.22 रोजी रात्री 11 वाजता ही घटना घडली. तसेच सुनिल दाजमल घरटे (वय 45 रा.जुनागाव, सामोडे ता. साक्री) यांनी दि.23 रोजी आत्महत्या केली. ते वडीलोपार्जीत शेती सामायिक पध्दतीने करीत होते. तसेच अनेक दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते. त्यातूनच त्यांनी राहत्या घराच्या जिन्याच्या साठ्याला दोरीने गळफास घेत जिवन संपविले. आणखी एका घटनेन सदगा पो. कोडीद (ता. शिरपूर) येथील उखड्या पावरा (वय 28) या तरूणाने बोरपाणी शिवारात शेताच्या बांधावरील खाकराच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. काल दि.23 रोजी दुपारी ही घटना उघडकीस आली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सांत्वन

0
पुणे । प्रतिनिधी Pune जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या पर्यटकांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...