Monday, September 23, 2024
Homeमुख्य बातम्यापुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

मुंबई | Mumbai

- Advertisement -

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील (Pune-Solapur National Highway) दौंड तालुक्याजवळील (Daund Taluka) चौफुला येथे आज पहाटेच्या सुमारास लक्झरी बस आणि ट्रकचा भीषण अपघात (Accident) झाल्याने ४ जणांचा मृत्यू (Death) झाला आहे…

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, टायर फुटल्याने महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला लक्झरी बस धडकल्याने हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, यात बसचा चक्काचूर झाला. तसेच मृतांपैकी तीन पोलिस (Police)असल्याची माहिती समोर आली असून २० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. तर जखमी असलेल्या काही प्रवाशांची (Passengers) प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना यवत, केडगाव, आणि पुण्यामधील रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले असून अपघातग्रस्त लक्झरी बस सोलापूरकडून (Solapur) पुण्याच्या दिशेने जात होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या