Sunday, June 23, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकमध्ये गणपती विसर्जनावेळी चार जण बुडाले; दोघांचा मृत्यू, दोन जणांचा शोध सुरू

नाशिकमध्ये गणपती विसर्जनावेळी चार जण बुडाले; दोघांचा मृत्यू, दोन जणांचा शोध सुरू

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

आज सकाळपासून नाशिक शहरासह (Nashik City) ग्रामीण भागांत उत्साहात गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक सुरू होती. मात्र, सायंकाळच्या सुमारास गणपती विसर्जनावेळी (Ganpati immersion) दोन वेगवगळ्या घटनांमध्ये चार जण बुडाल्याची (Drowned) दुर्दैवी घटना घडली आहे…

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील रामकुंड परिसरामधील (Ramkund Area) गाडगे महाराज पुलाजवळील घाटावर दोन जण बुडाल्याची घटना समोर आली आहे. हे दोघे जण विसर्जनासाठी दाखल झाले होते. याचवेळी ते दोघेही बुडाल्याची माहिती समोर आली असून सद्यस्थितीत या दोघांचाही महापालिकेच्या अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शोध घेतला जात आहे.

तर दुसरी घटना इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) वालदेवी धरणाच्या (Waldevi Dam) परिसरामध्ये घडली आहे. वालदेवी परिसरात मित्रांसोबत गेलेल्या दोन युवकांचा धरणात बुडून मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली असून या दोघांचेही मृतदेह शोधण्यात पोलिसांना (Police) यश आले आहे. तसेच पुढील कार्यवाहीसाठी हे दोन्ही मृतदेह नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या