Thursday, May 23, 2024
Homeदेश विदेशमोहरमच्या मिरवणुकीला गालबोट! विजेचा शॉक लागून चौघांचा मृत्यू, १० जण भाजले

मोहरमच्या मिरवणुकीला गालबोट! विजेचा शॉक लागून चौघांचा मृत्यू, १० जण भाजले

दिल्ली । Delhi

झारखंडमधील बोकारो येथे मोहरमच्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना घडली आहे. हायटेंशन वायरच्या संपर्कात आल्यानं १३ जण होरपळले. यातील चौघांचा मृत्यू झाला असून अन्य ९ जणांची प्रकृती गंभीर आहे..

- Advertisement -

बोकारोच्या बेरमो परिसरातील खेतकोमध्ये सकाळी मोहरमची मिरवणूक निघाली. ताजिया घेऊन जात असताना विजेच्या तारेला स्पर्श झाला. त्या तारेतून ११००० वोल्टचा वीज प्रवाह जात होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ताजिया उचलताच त्याचा स्पर्श हायटेंशन वायरला झाला. त्यामुळे ताजियामधील बॅटरीचा स्फोट झाला. ताजियाचा संपर्क विजेच्या तारेशी येताच १३ जण गंभीररित्या भाजले. त्यातील चौघांचा मृत्यू झाला. तर अन्य ९ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना डीव्हीसी बोकारो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, या घटनेचे वृत्त समजताच घटनास्थळी स्थानिकांनी मोठी गर्दी झाली आहे. यासोबतच डीव्हीसी हॉस्पिटलमध्ये जखमींच्या नातेवाईकांनी गर्दी झाली आहे. प्रशासनाला माहिती मिळताच पेटरवार पोलीस ठाणे आणि बोकारो थर्मल पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या