Sunday, May 26, 2024
Homeधुळेनगावबारीतील हाणामारीप्रकरणी चौघांना अटक

नगावबारीतील हाणामारीप्रकरणी चौघांना अटक

धुळे । Dhule। प्रतिनिधी

शहरातील देवपूर भागातील नगावबारी (Nagaonbari) परिसरात काल दुपारी दोन गटात तुफान हाणामारी (clash between two groups) झाली. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे नोंद झाले असून पोलिसांनी दोन्ही गटातील चौंघांना अटक (Four people were arrested) केली आहे.

- Advertisement -

याप्रकरणी योगेश उर्फ सोन्या राजेंद्र चव्हाण (वय 30रा.अष्टकोनी ओटा, नगावबारी, देवपूर, धुळे) याने पश्चिम देवपूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन नरेश कांतीलाल गवळी, मुन्ना हनुमंत वाडीले, आकाश पानथरे, ऋषभ शिरसाठ, निरज गिरासे, अविनाश परदेशी, अक्षय जोशी, पंकज बन्सीलाल परदेशी अशा आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी या आठ जणांपैकी नरेश गवळी व निरज गिरासे याला अटक केली आहे. तर उर्वरीत संशयीतांचा शोध सुरु आहे.

परस्पर विरोधात दुसर्‍या गटातील आकाश उमेश पानसरे (वय 26 रा. प्लॉट नं. 162, विद्यानगर, देवपूर, धुळे) याने फिर्याद दिली होती. त्यानुसार अमोल मराठे, प्रफुल्ल भोई, हरिष गिरासे, सोनू धोबी, शुभम देशमुख, जंभ्या नरोटे, शुभम भामरे, गणेश जाधव या आठ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता.

त्यातील योगेश चव्हाण व हरिष गिरासे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सैय्यद करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या