Sunday, June 14, 2026
Homeदेश विदेशBuilding Collaps: दिल्लीत चार मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली; अनेक जण ढिगाऱ्याखाली...

Building Collaps: दिल्लीत चार मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली; अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरु

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास वेलकम परिसरातील जनता मजदूर कॉलनीत चार मजली इमारत कोसळली. दुर्घटना घडली तेव्हा इमारतीत अनेक लोक उपस्थित होते, त्यापैकी अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. घटना घडल्यानंतर बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, आठ जणांची मलब्यातून सुटका करण्यात आली आहे. सात जणांना जेपीसी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर एकावर जीटीबी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अनेकजण अद्यापही आतमध्ये अडकल्याची शक्यता आहे. लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीत ८ ते १० लोक वास्तव्यास होते. यामध्ये तीन लहान मुले आणि तीन महिलांचा समावेश आहे.

- Advertisement -

हा परिसर खूप दाट लोकवस्तीचा असल्याने आणि अरुंद रस्ते असल्याने बचावकार्य अवघड आहे. अशा परिस्थित पथकाला बचावकार्य करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पथकाने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच इतर रहिवाशांना देखील ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात येईल. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकासह अग्निशमन दल आणि इतर संस्थांचे मोठे अधिकरी घटनास्थळी हजर आहेत. इमारत कोसळल्याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. इमारत कोसळल्यानंतर स्थानिकांनीही बचावकार्यासाठी धाव घेतली होती.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : महायुतीचा ‘हॉटेल पॉलिटिक्स’वरती भर; तर मविआत...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) आकडे पाहिले तर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra...