Thursday, September 12, 2024
Homeनाशिकअकरावी प्रवेशासाठी पहिल्याच दिवशी 'इतक्या' विद्यार्थ्यांची नोंदणी

अकरावी प्रवेशासाठी पहिल्याच दिवशी ‘इतक्या’ विद्यार्थ्यांची नोंदणी

नाशिक | Nashik

अकरावी प्रवेशासाठी (11th Admission) पहिल्‍याच दिवशी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शनिवारी सायंकाळपर्यंत चार हजार ६३८ अर्ज दाखल झाले होते. अकरावी प्रवेशासाठी सर्व शाखा मिळून २४ हजार ७५० जागा उपलब्‍ध आहेत.

- Advertisement -

यंदा अकरावी प्रवेशासाठी सीईटी (11th CET Exam) घेण्यात येणार होती. परंतु काही कारणास्तव ती रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर कालपासून अकरावी प्रवेशासाठी नोंदणी (Admission Registration) सुरू करण्यात आली आहे.

शालेय शिक्षण विभागातर्फे (School Education Department) राज्‍यातील प्रमुख महापालिका हद्दींमध्ये केंद्रिभूत ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया (Online Admission) राबविली जाते. यात नाशिक महापालिकेचाही समावेश आहे.

अकरावी प्रवेशाकरिता अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया शनिवारी (ता.१४) सुरू झाली. पहिल्‍याच दिवशी विद्यार्थ्यांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. सायंकाळी सातपर्यंत चार हजार ६३८ विद्यार्थ्यांची संकेतस्‍थळावर नोंदणी झाली होती. दोन हजार २६६ अर्ज लॉक केलेले आहेत. एक हजार १०४ विद्यार्थ्यांच्‍या अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

मंगळवारपासून भाग दोन नाशिक महापालिका (Nashik Mahapalika) क्षेत्रातील ५८ कनिष्ठ महाविद्यालयांत विविध शाखांच्‍या २४ हजार ७५० जागा उपलब्‍ध आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी २२ ऑगस्‍टपर्यंत मुदत आहे.

मंगळवार (ता.१७)पासून अर्जाचा भाग दोन भरता येणार आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शाखा, कनिष्ठ महाविद्यालयांचा प्राधान्‍यक्रम नोंदविता येईल.

असे असेल वेळापत्रक

२३ ऑगस्‍टला तात्पुरती गुणवत्तायादी जाहीर केली जाईल. यादीसंदर्भातील हरकती, तक्रार नोंदविण्याकरिता २४ ऑगस्‍टच्‍या सायंकाळी पाचपर्यंत वेळ उपलब्‍ध असेल. २५ ऑगस्‍टला सामान्‍य गुणवत्ता यादी जाहीर होईल.

२५ व २६ ऑगस्‍ट असे दोन दिवस माहिती प्रक्रियेसाठी राखीव ठेवले आहेत. २७ ऑगस्‍टला पहिल्‍या फेरीतील गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. या यादीतील विद्यार्थ्यांना ३० ऑगस्‍टपर्यंत प्रवेशाची मुदत असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या