Saturday, January 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशकातील कॉलेज रोडवर आगीत चार ते पाच दुकाने जळून खाक

नाशकातील कॉलेज रोडवर आगीत चार ते पाच दुकाने जळून खाक

नाशिक | प्रतिनिधी

अचानक लागलेल्या आगीत कॉलेज रोडवरील एचपीटी कॉलेजसमोरील चार ते पाच अल्पोपहाराची दुकाने जळून खाक झाली. ही घटना आज रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली.

- Advertisement -

दुकान परिसरातून अचानक धूर निघताना दिसल्यानंतर उपस्थित नागरिकांनी आणि दुकानदारांनी तातडीने दुकान चालकांना सूचना दिल्या. लगेचच दुकाने उघडून पाहिली असता आगीने अचानक भडका उडाल्याचे निदर्शनास आले. यानंतर तात्काळ अग्निशामन दलाला पाचारण करण्यात आले.

YouTube video player

सातपूर येथील शिंगाडा तलाव अग्निशामन केंद्राच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले. वेळीच कारवाई करण्यात आल्याने आग आजूबाजूच्या इतर दुकानांपर्यंत व परिसरात पसरण्यापासून रोखण्यात यश आले.

या आगीत झालेल्या नुकसानीचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही. मात्र आग वेळेत आटोक्यात आणल्यामुळे मोठी वित्तहानी टळली असल्याचे सांगण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Sangamner : अवैध कत्तलखान्यावर ‘एलसीबी’चा पुन्हा सर्जिकल स्ट्राईक

0
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner शहरातील अवैध कत्तलखान्यावर (Illegal Slaughterhouses) अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB) शुक्रवारी (दि.23) महिन्याभरात चौथी मोठी कारवाई केली आहे. गोवंश जनावारांचे कत्तल...