Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रतब्बल १५ वर्षांनी मिळाला पगार, आनंदात असतानाच मृत्यूनं गाठलं; शिक्षकासह मुलाचा दुर्दैवी...

तब्बल १५ वर्षांनी मिळाला पगार, आनंदात असतानाच मृत्यूनं गाठलं; शिक्षकासह मुलाचा दुर्दैवी अंत

छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगरमध्ये एक भीषण अपघात (Accident) झाल्याची माहिती मिळत आहे. चार वाहने एकमेकांना धडकली असून या भीषण अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू झाला आहे…

- Advertisement -

भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन हायवा, एक मोटारसायकल आणि कार अशा चार वाहनांमध्ये हा भीषण अपघात झाला. पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील नक्षत्रवाडी गावाजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातात पैठण येथील शिक्षक संजय सुखदेव दहिफळे तसेच त्यांचा 13 वर्षीय मुलगा जागीच ठार झाला. पत्नी कौशल्या दहिफळे गंभीर जखमी झाल्या आहेत.

संजय दहिफळे यांच्या मुलीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. त्यामुळे नीटच्या तयारीसाठी तिने शहरातील एका खाजगी क्लासमध्ये प्रवेश घेतला होता. दरम्यान संजय यांच्या पत्नी वर्षा यांचे माहेर बीड बायपासला असल्यामुळे त्या आपल्या मुलांसह आधीच शहरात आल्या होत्या.

तर मुलांना भेटल्यानंतर संजय हे पत्नी मुलगा समर्थसह दुचाकीवरून पैठणकडे निघाले होते. मात्र नक्षत्रवाडी जवळ पैठणकडून एक खडीचा हायवा येत होता आणि दुसऱ्या बाजूने पैठणकडे एक बलेनो कार जात होती. यावेळी हायवाने बलेनो कारला जोराची धडक दिली. या धडकेत संबंधित कार रस्त्याच्या कडेला जाऊन थांबली. मात्र याचवेळी अपघातग्रस्त हायवाने संजय यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.

राज्यात भाजपला २०२४ मध्ये सुरुंग? ‘त्या’ अहवालाबद्दल विनोद तावडेंचं सूचक ट्वीट

हा अपघात इतका भीषण होता की, हायवाने संजय यांच्या गाडीला धडक दिल्यावर त्यांची दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आली. या हायवाचा एवढा वेग होता की, संजय यांच्या दुचाकीला धडक दिल्यानंतर अपघातग्रस्त हायवा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसऱ्या हायवावर जाऊन आदळला.

Nashik : विहिरीचा बार उडविताना भीषण दुर्घटना; तीन कामगारांचा मृत्यू, एक गंभीर

या भीषण अपघातात संजय आणि त्यांचा मुलगा समर्थ दहिफळेचा जागीच मृत्यू झाला. तर संजय यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Nashik : विहिरीचा बार उडविताना भीषण दुर्घटना; तीन कामगारांचा मृत्यू, एक गंभीर

दरम्यान, वडगोद्री येथील विवेकानंद शिक्षण संस्थेच्या श्री गुरुदेव विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयात संजय दहिफळे हे 2008 पासून शिक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र त्यांना पगार सुरू झाला नव्हता. पुढे 2018 मध्ये त्यांना अनुदानासाठी मान्यता मिळाली. मात्र प्रत्यक्षात पगार हाती आला नव्हता. दरम्यान मार्च महिन्याच्या पहिलाच 15 हजार रुपये पगार दोन दिवसांपूर्वी त्यांच्या बँक खात्यात जमा झाला होता. विशेष म्हणजे एवढ्या वर्षांनी मिळालेला पगार त्यांनी बँकेतून काढलाही नव्हता, पण त्यापूर्वीच त्यांचा अपघाती मृत्यू झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या