Saturday, May 4, 2024
Homeजळगावलाकडांची अवैध वाहतूक करणारे चार वाहने पकडले

लाकडांची अवैध वाहतूक करणारे चार वाहने पकडले

चाळीसगाव Chalisgaon । प्रतिनिधी

निंबाच्या झाडाची कत्तल (Tree slaughter) करून अवैध रित्या वाहतूक करणारी (carrying illegal timber) ट्रॅक्टर पकडल्याची घटना ताजी असताना, आता पुन्हा चंदन लाकडाची तस्करी (Smuggling of sandalwood) होत असल्याची माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलीसांना मिळाल्यानंतर ठिकठिकाणी नाकेबंदी(Blockade) केली असता अवैध वृक्षतोड करून त्याची चोरटी वाहतुक करणारी चार वाहने (Four vehicles) पोलिसांच्या हाती लागली. ही चारही वाहने मालेगाव येथील असून याप्रकरणी चारही वाहनांच्या चालकांना पोलीसांनी ताब्यात (possession) घेतले आहे.

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असे की चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना दि. १० रोजी माहिती मिळाली की, एमएच.१८ एम. ६७७८, एमएच.१८ बीजी. २९१८, एमएच.१९ के.८२७४ व एमएच.०४ एस.३२६८ या वाहनांपैकी कोणत्यातरी एका वाहनात अवैध चंदनाची तस्करी होणार आहे. या गुप्त माहितीनुसार पोलीसांची वेगवेगळे पथके तयार करुन ती वाघळी रस्ता, मालेगाव रस्ता, धुळे रस्ता अशा ठिकाणी पाठविण्यात आली.

पोलिसांनी वाघळी रस्त्यावर बोरखेडा जवळ एमएच.१८ एम. ६७७८ व एमएच.व एमएच.१८ बीजी. २९१८ या दोन ट्रका पकडल्या. त्यांची पाहणी केली असता त्यात लिंबाचे व बाभळाचे अवैध लाकूड मिळून आले. या वाहनांवरील चालकांची नावे विचारली असता इम्रानखान जब्बार खान व मुतालीबखान लियाकत खान दोन्ही रा. मालेगाव असे सांगण्यात आले. धुळे,मालेगाव रस्त्यावर दाेन ट्रक पकडले त्यानंतर धुळे रस्त्यावर बायपासवर नाकाबंदी दरम्यान पथकाला संशयित वाहन एमएच.०४ एस.३२६८ हे वाहन मिळून आले. त्याची पाहणी केली असता त्यात सुद्धा लिंबाची लाकडे मिळून आली.

त्यावरील चालकाचे नाव नईम शेख कय्युुम शेख रा. उंबरखेड असे आहे. तिसरी कारवाई मालेगाव रस्त्यावर करण्यात आली. एमएच.१९ के.८२७४ ही गाडी बेलगंगाजवळ मिळून आली. त्यात सुद्धा लिंबाची लाकडे आढळून आली. या वाहनावरील चालक सद्दाम सैय्यद हसन रा. तांबोळे असे असल्याचे समोर आले. तर या सर्व वाहनांचे मालक मजहर खान, आलीफखान, कादीर सैय्यद, सर्व राहणार मालेगाव असे आहेत. अवैध लाकूड वाहतुक प्रकरणी जप्त केलेली सर्व वाहने पुढील कारवाईसाठी वन विभागाच्या (Forest Department) ताब्यात देण्यात आली आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ प्रविण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी भरत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सहाय्यक निरीक्षक रमेश चव्हाण, धरमसिंग सुंदरडे, पोना. गोवर्धन बोरसे, शांताराम पवार, संदीप पाटील, नितीन अमोदकर, हवालदार युवराज नाईक, ज्ञानेश्वर बडगुजर, देविदास पाटील, नंदू परदेशी, संतोष शिंदे, चालक पोना मनोहर पाटील, अनिल आगोणे यांनी केली.

दरम्यान चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या लाकूड तस्करी विरोधात धडक मोहिमेमुळे लाकुड तस्करांचे धाबे दणाणले आहे. चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचे सिद्ध झाले असून वन विभागाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या