दिंडोरी । प्रतिनिधी Dindori
दिंडोरी तालुक्यातील शेतकर्यांची फसवणूक केल्याप्रकरणी दिंडोरी पोलिस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दिंडोरी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून अन्य दोघे फरार झाले आहे.
दिंडोरी तालुक्यातील वाघाड येथील शेतकरी कैलास मनोहर केदारे यांनी दिंडोरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, ‘आरोपींनी शेतकर्यांना ट्रॅॅक्टर घेवुन देतो, सदरचा ट्रॅक्टरवर कर्ज प्रकरण करतो. ट्रॅक्टरचे हप्ते निल होई पर्यंत ट्रॅक्टर आमचे कंपनीत कामास लावु, हप्ते सुध्दा आम्हीच भरु, ट्रॅक्टर जेव्हा निल होईल तेव्हा तुम्हाला ट्रक्टर देवु, तसेच दरमहा तुम्हाला भाडे म्हणुन 5,000 रुपये मिळतील’ असे आमिष दाखवुन फिर्यादी व साक्षीदार यांचे नावावर कर्ज प्रकरण तयार करून कर्जाने ट्रॅॅक्टर खरेदी करुन तो फिर्यादी व साक्षीदार यांना न देता परस्पर कोठेतरी विक्री करुन फिर्यादी व साक्षीदार यांची असे एकुण चार ट्रॅक्टर 58,29,047 रुपयांची फसवणुक करुन रक्कमेचा अपहार केला आहे.
याप्रकरणी ज्ञानेश्वर दत्तात्रय वैद्य (वय 43, रा. बहादुरी ता. चांदवड), योगेश दिनकर वाघ (वय 46, रा. मुखेड ता. निफाड, युवराज संतु गांगोडे (रा. वाघाड ता. दिंडोरी), कृष्णा हिरामण गायकवाड (वय 43, रा. पिंंपळगाव बसवंत ) यांना दिंडोरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना 10 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. यातील दोन आरोपी ज्ञानेश्वर प्रकाश जाधव (रा. पिंंपळगाव बसवंत, ता. निफाड) व दत्तात्रय बाळासाहेब शिरसाठ (बहादुरी, ता. चांदवड) हे दोघे फरार झाले आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अल्ताफ शेख व दिंडोरी पोलिस करीत आहे.