Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रटवाळखोरांकडून चार चाकी वाहनांची तोडफोड

टवाळखोरांकडून चार चाकी वाहनांची तोडफोड

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

आदर्श सोसायटी परिसरात शनिवारी सायंकाळी तीन ते चार जणांच्या टोळक्याने हातात लोखंडी रॉड घेऊन चारचाकी वाहनांची तोडफोड करत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे ८ ते ८.१५ वाजण्याच्या दरम्यान तीन ते चार अज्ञात तरुण अचानक आदर्श सोसायटी परिसरात आले. त्यांच्या हातात लोखंडी रॉड होते. त्यांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन चारचाकी वाहनांच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला आहे. या टोळक्याने नेमक्या कोणत्या कारणातून ही तोडफोड केली, याचा तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी अशा टवाळखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढविण्याचीही मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

समीर भुजबळ यांचे निकटवर्तीय तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर वझरे यांची देखील बीएमडब्ल्यू चार चाकीचे नुकसान या तोडफोडीत झाले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : तीन नेते, दोन तास अन् आमराईत काय शिजले?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोधचा फॉर्म्युला आकाराला येणार की राजकीय आखाडा रंगणार, याचा फैसला होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना शनिवारी सोनईच्या ‘आमराईत’...