Saturday, May 4, 2024
Homeनगरचारचाकी, दुचाकी चोरणारी टोळी पकडली

चारचाकी, दुचाकी चोरणारी टोळी पकडली

अहमदनगर | Ahmedagar

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून चारचाकी व दुचाकी वाहनांची चोरी करणार्‍या टोळीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आवळल्या आहे.

- Advertisement -

हर्षद भगवान गंगतिरे (वय- 28 रा. चंदनझिरे जि. जालना), दिनेश राधाकिसन काठोटे (वय- 32 रा. हनुमान घाट जि. जालना) व संतोष नामदेव सानप (वय- 25 रा. गुंजाळवाडी ता. सिंधखेड राजा. जि. बुलढाणा) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीचा 5 चारचाकी व 2 दुचाकीसह 25 लाख 5 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

अनिल शिवाजी मेहत्रे (रा. नवनागापूर) यांची चारचाकी चोरीला गेल्याची फिर्याद एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. शहरातून चारचाकी व दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना बाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रभावी कामगिरी करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना सुचना केल्या होत्या. निरीक्षक पवार यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी मनोज गोसावी, संदीप पवार, संतोष लोढे, सचिन आडबल, दिपक शिंदे, दत्ता गव्हाणे, प्रकाश वाघ, विनोद मासाळकर, उमाकांत गावडे यांचे पथक चारचाकी व दुचाकी चोरीतील आरोपींच्या शोधासाठी कामाला लागले. अनिल मेहत्रे यांची चारचाकी हर्षद गंगतिरे याने इतरांच्या मदतीने चोरी केल्याची माहिती निरीक्षक पवार यांना मिळाली होती. पथकाने जालना जिल्ह्यात जावून गंगतिरे याला अटक केली. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत विचारणा केली असता चारचाकी व दुचाकी चोरीबाबत त्याने पोलिसांना माहिती दिली. यासाठी त्याला मदत करणारे दिनेश काठोटे व संतोष सानप यांची नावे समोर आली. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांना अटक करत त्यांच्याकडे असलेली चोरीचे वाहने जप्त केली. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या