Wednesday, May 14, 2025
Homeनगरअंगावर दगड पडून चार वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

अंगावर दगड पडून चार वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

खेळत असताना चार वर्षांचा चिमुकल्याचा अंगावर दगड पडून त्यात त्याचा मृत्यू झाला. सार्थक नवनाथ गोलवड (रा. शिराढोण, ता. अहिल्यानगर) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे. शिराढोण गावामध्ये सोमवारी (12 मे) दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सार्थक गोलवड हा सोमवारी दुपारी आपल्या मित्रासोबत गावातील सिना नदीच्या काठावर खेळत असताना, अचानकपणे त्याच्या अंगावर मोठा दगड पडला. त्यामुळे तो बेशुध्द झाला.

घटनास्थळी उपस्थित असलेले सुनील दरेकर (रा. शिराढोण) यांनी त्याला तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे नेले. मात्र, दुपारी 2.50 वाजता रूग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तपासून त्याला औषधोपचार सुरू होण्याआधीच मृत घोषित केले. या घटनेची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. बोठे यांनी रूग्णालयात ड्यूटीवर असलेल्या तोफखाना पोलिसांना दिली. त्यांनी अहिल्यानगर तालुका पोलिसांना दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी तालुका पोलिसांनी भेट दिली आहे. दरम्यान, सदर घटना कशी घडली, आणि नेमकी कोणती परिस्थिती होती याची अधिक चौकशी सुरू आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sangamner : सहकारमहर्षी थोरात साखर कारखान्याच्या पदाधिकारी निवडी जाहीर

0
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली देशातील सहकारासाठी मार्गदर्शक ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची...