Thursday, October 31, 2024
Homeशब्दगंधप्रांजळ अनुभवकथा

प्रांजळ अनुभवकथा

– रवींद्र मालुंजकर

आदिवासी-दुर्गम भागात सर्वार्थाने असणारी अभावग्रस्त परिस्थिती भेदून या परिसरातील मुलांना शिक्षण (Education) प्रवाहात आणणार्‍या हाडाच्या शिक्षकांचे (Teachers) कार्य हे खरोखरच अद्वितीय आहे. अशाच एका ध्येयवादी आणि आश्रमशाळेत ज्ञानदानाचे कार्य करणार्‍या अमृता भालेराव यांचा ‘फुलं… मला भेटलेली’ हा लघुकथा संग्रह (Short story collection) एकापेक्षा एक सरस अशा प्रांजळ अनुभवांच्या कथा वाचकांना देणारा आहे.

- Advertisement -

पुणे (Pune) येथील अग्रगण्य संवेदना प्रकाशन संस्थेने (Samvedana Prakashan Sanstha) हा उत्तम कथासंग्रह प्रकाशित केला आहे. आकर्षक मुखपृष्ठासह नंदू गवांदे यांच्या आतील रेखाचित्रांनी पुस्तकाच्या श्रीमंतीत भर पडते. शिक्षकी पेशा हा केवळ व्यवसाय नाही तर ते एक मनस्वीपणे झोकून देत करावयाचे व्रत आहे. हे व्रत करताना स्वत:च्या रागलोभाची आणि ऊन-पावसाची पर्वा न करता कार्य करावे लागते.

गोरगरीब आणि सर्वच सुविधांपासून वंचित असणार्‍या परंतु शिकण्यासाठी उत्सुक असणार्‍या मुलांच्या समस्या शोधून त्यावर संवेदनशील वृत्तीने निसर्गाशी तादात्म्य पावणार्‍या या लघुकथा म्हणजे लेखिकेचे रसरशीत जीवानुभव आहे. श्रीनिवासन, चिऊचा गुलाब, अमावस्येची चंद्रिका, जादूचं औषध, गजरेवाली टक्का (व्हाया) सिग्नल, अबोलीचा गजरा, राजलता या सात कथा वाचकाला मंत्रमुग्ध करत विचारचक्रात टाकतात.

मुले समजून घेण्याचा लेखिकेचा हा प्रवास अतिशय जिवंत असा आहे. सुप्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांची वाचनीय प्रस्तावना ही या पुस्तकाची जमेची बाजू आहे. तर सुप्रसिद्ध लेखिका वीणा गवाणकर, डॉ. निशिगंधा वाड, ज्येष्ठ साहित्यिक विश्वनाथ शिरढोणकर, नागरी प्रशासन आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी, लेखक शिवाजीराव चाळक यांच्या छोटेखानी शुभेच्छा लेखिकेच्या लेखन प्रवासाला बळकटी देतात.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या