Monday, May 12, 2025
Homeक्राईमCrime News : जादा परताव्याच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणूक

Crime News : जादा परताव्याच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणूक

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

एका मल्टिपर्पज अर्बन निधी लिमिटेड कंपनीने जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत श्रीगोंदा तालुक्यातील गुंतवणूकदारांची कोटवधींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कंपनीच्या प्रलोभनाला बळी पडलेले गुंतवणूकदार पैसे परत मिळत नसल्याने हतबल झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी, तालुक्यात चार वर्षांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या एका मल्टिपर्पज अर्बन निधी लिमिटेड कंपनीने सुरुवातीला गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले असल्याचे सांगत ठेवीवर महिन्याला 10 ते 12 टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवले.

- Advertisement -

महिन्याला लाख रुपयांना दहा ते बारा हजार परतावा देवून विश्वास संपादन केला. त्यामुळे कंपनीत गुंतवणूकदारांची रीघ लागली. कुणी पदरचे पैसे गुंतवले,कुणी जास्त परतावा मिळतो म्हणून कर्ज काढले,जमिनी,जागा विकून इथ गुंतवणूक केली. वेळप्रसंगी सावकार,बँकेकडून कर्ज काढून कंपनीमध्ये पैसे गुंतवले अनेकांनी कोट्यवधी रुपयांच्या ठेवी कंपनीकडे जमा केल्या त्यासाठी एजंट आणि अधिकृत व्यवसाय भागीदारांना भरघोस कमिशन देण्यात आले. आता, गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार मागणी करुनही कंपनीकडून गुंतवणूकदारांना पैसे मिळत नसल्याने अनेकजण धास्तावले आहेत. मल्टिपर्पज अर्बन निधी लिमिटेड कंपनीकडून एका दुसर्‍याच कंपनीकडून तुमचे पैसे परत दिले जातील असे सांगण्यात येत असून ठेवीदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

सध्या दहा टक्केचा ट्रेडही नाही आणि व्याजही मिळत नसल्याने फसवणूक झालेल्या ठेवीदारांची मुद्दल परत मिळवण्यासाठी गुंतवणूकदारांनी कंपनीकडे तगादा लावला आहे. ठेवीदारांकडून कोट्यवधी रुपये गोळा करुन मल्टिपर्पज अर्बन निधी लिमिटेड कंपनीच्या नावावर काही लाख रुपयेच भागभांडवल असल्याचे दाखवण्यात आले आहे. नाव बदलून दुसरी मल्टिस्टेट चालू करण्यात आहे. त्यामुळे ठेवीदारही गोंधळले आहेत. एजंटमार्फत गोळा केलेले कोट्यवधी रुपये कंपनीने शेअर मार्केटमध्ये गुंतवले. एका वेबसाईटवरून महिन्याला ट्रेड टाकले जात होते. दोन महिन्यांपूर्वी दहा टक्केचा ट्रेड अवघा 1.20 टक्क्यांवर आला पण पैसे रिफंड देण्यास सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, दहा-वीस हजार रुपये गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांनाही कपंनीकडून अद्याप पैसे परत मिळालेले नाहीत.

गौडबंगाल काय ?
मल्टिपर्पज अर्बन निधी लिमिटेड कंपनीमध्ये जास्त परतावा मिळतो म्हणून हजारो कोटी गुंतवले ती कंपनीच बंद करून त्यातील सर्व रक्कम दुसर्‍या कंपनीत वळविण्यात आल्याचे मल्टिपर्पज अर्बन निधी लिमिटेड कंपनीकडून सांगण्यात येत आहे. याबाबत ठेवीदारांना कोणतीही कल्पना देण्यात आली नाही. त्यामुळे नेमके गौडबंगाल काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

प्रलोभनाला बळी पडू नका
पतसंस्था, गुंतवणूक कंपन्यांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. त्यानंतरही जास्त परतावा मिळण्याच्या आमिषाला अनेकजण बळी पडून आपले पैसे गमावून बसत आहेत. कोणत्याही गुंतवणूक कंपनीत पैसे गुंतविताना नागरिकांनी विचार केला पाहिजे. जास्त व्याज, परताव्याला भुलून गुंतवणूक करू नये. प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shrirampur : फत्त्याबाद अ‍ॅसिड हल्ल्याचा तपास लागेना; पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह?

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur गेल्या महिनाभरापूर्वी तालुक्यातील फत्त्याबाद येथे झालेल्या अ‍ॅसिड हल्ला प्रकरणाचा अद्यापही पोलीस प्रशासनास तपास लागलेला नाही. या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले...