Friday, April 25, 2025
Homeक्राईमFraud News : शेअर ट्रेडिंगच्या नादाला लागले, ५० लाख गेले!

Fraud News : शेअर ट्रेडिंगच्या नादाला लागले, ५० लाख गेले!

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून शिर्डी (ता. राहाता) येथील सेवानिवृत्त व्यक्तीची तब्बल ५० लाख एक हजार ३७९ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, सोशल मीडियावरील शेअर ट्रेडिंगच्या माहितीवरून संपर्क झालेल्या अनोळखी महिलेने ही फसवणूक केली आहे.

- Advertisement -

याप्रकरणी येथील सायबर पोलीस ठाण्यात कांचन नावाच्या व्हॉट्सअॅप मोबाईल नंबर धारक महिलेविरूध्द भादंवि कलम ४१९, ४२० सह आयटी अॅक्ट कलम ६६ (डि) नुसार गुरूवारी (९ जानेवारी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरण विभागातून सेवानिवृत्त झालेल्या शिर्डी येथील व्यक्तीने फिर्याद दिली आहे.

सदरचा प्रकार १२ एप्रिल २०२४ ते १७ मे २०२४ दरम्यान घडला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. फिर्यादी यांना शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करायची असल्याने ते यासंदर्भातील माहिती सोशल मीडियावरून घेत होते. त्यादरम्यान त्यांना कांचन नामक महिलेने व्हॉट्सअॅपवरून संपर्क केला. शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळून देण्याचे आमिष दाखविले व त्यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादीने त्या महिलेवर विश्वास ठेऊन १२ एप्रिल २०२४ ते १७ मे २०२४ दरम्यान ५० लाख एक हजार ३७९ रुपये त्या महिलेने दिलेल्या बँक खात्यावर पाठविले.

दरम्यान, फिर्यादी यांना नफा मिळाला नाही व त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम देखील मिळाली नाही, यामुळे आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्ष्यात आले. त्यानंतर फिर्यादीने सायबर पोलिसांना माहिती दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...