Saturday, May 18, 2024
Homeधुळेसव्वाबारा लाखांची फसवणूक, दोघांविरुध्द गुन्हा दाखल

सव्वाबारा लाखांची फसवणूक, दोघांविरुध्द गुन्हा दाखल

धुळे । dhule । प्रतिनिधी

बेटावद येथील फ्रुट व्यापार्‍याकडून (fruit merchant) गुजरातमधील (Gujarat) दोन व्यापार्‍यांनी (merchants) वेळोवेळी टरबूजाचा (watermelon) माल विकत घेतला. परंतु सव्वाबारा लाखांची थकबाकी करुन त्यांनी पैसे देण्यास (Refusal to pay) नकार दिला. त्यामुळे फसवणूक झालेल्या व्यापार्‍याने नरडाणा पोलिस ठाण्यात गुजरातच्या दोघांविरूध्द फसवणुकीची (Fraud) तक्रार दिली त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील रहिम खान रशिद खान पठाण हे फ्रुटचा व्यवसाय करतात. गेल्या वर्षी मार्च महिन्यात त्यांना गुजरातमधील अस्लम याकूब पाडा व हफनान अस्लम पाडा, दोन्ही रा. जुहूरपुरा फ्रुट मार्केट, मशिदी समोर, ग्रोधा (गुजरात) यांनी पठाण यांच्याशी दुरध्वनीद्वारे संपर्क साधला. आपल्याकडून फ्रुटची खरेदी करायची आहे असे सांगून दोघे मार्च महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात बेटावद येथे आले.

त्यांनी टरबुजाचा पुरवठा करा, तुम्हाला महिन्याभरातच पैसे पाठवतो असे सांगितले. यावर विश्वास ठेवून रहिम पठाण यांनी 12 लाख 25 हजार 114 रुपयांचा माल गुजरातला पाठविला. परंतु, माल पोहोचूनही दोघा व्यापार्‍यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. अखेर वर्षभराच्या अवधीनंतर आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रहिम पठाण यांनी नरडाणा पोलिसांत वरील दोन्ही संशयितांविरुद्ध फिर्याद दिली.

यावरुन दोघांविरुद्ध भादंवि 406, 420, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एएसआय गोटीराम पावरा हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या