नाशिक | प्रतिनिधी Nashik
- Advertisement -
सायबर चाेरट्यांनी शहरातील तिघांना सुमारे ७२ लाखांना गंडा घातला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियाचा वापर करून सायबर चाेरांकडून पाठविल्या जाणाऱ्या बाेगस लिंक्स, चॅटिंगच्या माध्यमातून सावज हेरले जातात. शेअर मार्केटमध्ये स्ट्रॉक ट्रेडिंगच्या नावाखाली जादा परताव्याचे आमिष दाखवून आत्तापर्यंत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे.
अखेर अनेक प्रयत्न करूनही ते पैसे मिळत नसल्याचे फसवणूक झाल्याचे तिघांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी नाशिक सायबर पोलिसात धाव घेत तक्रार केली. त्यानुसार अज्ञात सायबर भामट्यांविरोधीत आयटी अॅॅक्टअन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख हे करीत आहेत.