Thursday, February 5, 2026
Homeक्राईमनाशकातील चौघांना लाखो रुपयांचा गंडा

नाशकातील चौघांना लाखो रुपयांचा गंडा

नाशिक। प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

शेअर मार्केटमधून आयपीओ मिळवून देण्याच्या बहाण्याने भामट्यांनी शहरातील चौघांना ९३ लाख ८८ हजार ५६० रुपयांचा गंडा घातला आहे. सायबर पोलिसांकडे चौघांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयितांनी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान, गंडा घातला.

YouTube video player

व्हॉट्सअपवरून संपर्क साधून भामट्यांनी बनावट पोर्टल चौघांना डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर वेगवेगळ्या कंपन्यांचे आयपीओ खरेदी करून त्यातून नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने भामट्यांनी चौघांकडून सुमारे ९४ लाख रुपये घेतले. बनावट पोर्टलवर आयपीओ खरेदी केल्याचे भासवले.

मात्र चौघांनी ते विक्री करून पैसे पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पैसे मिळाले नाहीत. सायबर पोलिस तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

पडसाद : भाजप-शिवसेना संघर्षातील चांदवड पॅटर्न

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे- दै. ‘देशदूत’ – संपादक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये (Local Body Election) भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांनी भरीव कामगिरी केली. राज्यात...