नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon
ऑनलाईन पद्धतीने कमी वेळेत अधिक पैसे कमवण्याच्या प्रलोभनाला बळी पडून येथील एका व्यक्तीला टेलीग्राम युझर अकाउंटवरुन मेसेज पाठवून सुमारे 73लाख 31हजार 186 रुपये ऑनलाइन पद्धतीने काढून घेतले. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नांदगांव शहरातील रहिवासी प्रविण जयकुमार अग्रवाल (30) यांना टेलीग्राम युझर अकाउट वर मेसेज पाठवुन तुम्हाला घरबसल्या 2 ते 5 हजार रुपये कमवायचे आहेत का या नावाखाली जादा रिटर्नचे आमिष दाखवून याच आमिषाला बळी पडून आपल्याकडील बँकेचे डिटेल्स समोरच्या भामट्याला दिले. आणि बँक खात्यातून 73 लाख 31हजार 186 रूपये ऑनलाइन पद्धतीने काढून घेतले.
तुम्ही इंट्रेस्टेड असाल येस म्हणा किंवा नाही म्हणा. तेव्हा फिर्यादीने येस म्हणुन सांगितले असता वेबसाईड ची माहीती देवुन सदरची कंपनी ऑस्ट्रेलियाची सोन्याचे दागिने बनविणारी कंपनी आहे व या कंपनीत बनलेली सोन्याचे दागिने बिडींग केल्यास त्यावर कंपनीकडुन कमिशन मिळते असे अमिष दाखवुन प्रविण यांच्या वेबसाईटवर आयडी बनवुन देवुन या कंपनीने यांचेशी संपर्क करून दिला. कंपनीने प्रविण याचा विश्वास संपादन केला.याच कंपनीने प्रविण यांना वेगवेगळ्या बँकेत खाते उघडून यामध्ये 73लाख 31हजार 186 रुपये पैसे टाकण्यास सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा