Thursday, September 19, 2024
HomeनाशिकNashik Fraud News : शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवत सव्वा काेटी रुपये उकळले

Nashik Fraud News : शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवत सव्वा काेटी रुपये उकळले

डाॅक्टरसह व्यावसायिकांची फसवणूक 

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक (Investment) करण्यास सांगत शहरातील डाॅक्टरसह अन्य सहा व्यावसायिकांची तब्बल एक काेटी २१ लाख रुपयांची फसवणूक (Fraud) करण्यात आली आहे. याबाबत नाशिक शहर सायबर पाेलीस ठाण्यात (Nashik Cit Cyber Police Station) सायबर चाेरट्यांसह विविध टेलिग्राम, व्हाट्स ॲप व बँक खातेदारांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही सायबर चाेरट्यांनी शहरातील ३० हून अधिक व्यावसायिक, अभियंते, डाॅक्टर, सरकारी अधिकारी, पाेलीस, वकिल आणि सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांना १५-१८ काेटी रुपये उकळून फसविले आहे.

पाेलिसांच्या माहितीनुसार, शहरातील एका डाॅक्टरसह अन्य सहा व्यावसायिक आणि उद्याेजकांना सायबर चाेरट्यांनी मार्च ते जुलै २०२४ या कालावधीत व्हाट्सॲप, फेसबूक, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवरुन संपर्क साधला. त्यानंतर टेलिग्राम व व्हाट्सॲप ग्रुपमध्ये सदस्य म्हणूण ॲड केले. तसेच शेअर मार्केट व त्यातील छाेट्याशा पण, महत्त्वाद्या गाेष्टींबाबत माहिती दिली. छाेट्या रकमेची गुंतवणूक केली तर, त्यातही फायदा मिळेल. पण, माेठी रक्कम गुंतविली तर कमीत कमी कालावधीत जास्तीचा नफा मिळेल असे आमिष दाखविले.

दरम्यान, सायबर भामट्यांनी या डाॅक्टरसह इतर व्यावसायिकांना ‘स्किम’ वर विश्वास बसावा, यासाठी  वेगवेगळे व्हिडीओ पाठविले. ‘आम्ही ठराविक रक्कम गुंतविली असता, जास्तीचे पैसे मिळाले, फायदाच झाला’, आयुष्य पैशांच्या जाेरावरच जगता येते, कुठलीही महागडी वस्तू, कार खरेदी करण्यासाठी पैसाच लागताे’ त्यासाठी गुंतवणुक करा, कालांतराने शेअर ट्रेडिंग करतांना त्यातून दुप्पट आर्थिक लाभ मिळेल, असे अमिष तसेच विविध पीपीटी, व्हिडीओ स्लाईड, मुलाखती पाठविल्या. त्यामुळे डाॅक्टरचा (Doctor) विश्वास बसला. त्यामुळे त्याने संशयितांनी सांगितल्यानुसार ५० लाख रुपयांची गुंतवणूक केली.

मात्र, विहित कालावधीत काेणताही परतावा न मिळाल्याने व संशयितांशी संपर्क हाेत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सायबर पाेलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. दरम्यान, डाॅक्टरची ज्या पद्धतीने फसवणूक झाली, त्याच पद्धतीने इतर व्यावसायिकांची झाली असून त्यातील काहींनी कमी आधिक स्वरुपात लाखाे रुपये गुंतविले. त्यांनाही पैसे परत मिळाले नसल्याने त्यांनी तक्रार नाेंदविली आहे. 

काेणत्याही अनाेळखी व्हाट्स ॲप वा टेलिग्राम ग्रुपमध्ये सामिल हाेऊ नये. त्यावरील लिंकवर क्लिक करु नये. शेअर ट्रेडिंग हे फसवेगिरीचे जाळे झाल्याचे आचापर्यंतच्या गुन्ह्यातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे अधिक रकमेच्या काेणत्याही अमिषाला बळी पडू नये. ज्या अधिकृत एजन्सी व कंपनी आहेत, तेथे प्रत्यक्ष जाऊन ट्रेडिंग व त्ससंबंधी माहिती घ्यावी. फसवणूक टाळण्यासाठी सायबर पाेलीस ठाण्यात संपर्क साधावा. 

रियाज शेख, वरिष्ठ पाेलीस निरीक्षक, सायबर पाे. ठाणे 

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या