Saturday, July 27, 2024
HomeनाशिकNashik Crime News : युट्युब व्हिडिओ लाईकच्या नावाखाली तब्बल 'इतक्या' लाखांची फसवणूक

Nashik Crime News : युट्युब व्हिडिओ लाईकच्या नावाखाली तब्बल ‘इतक्या’ लाखांची फसवणूक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरात पोलिसांकडून (Police) सतत जनजागृती करण्यात येत असली तरी सायबर गुन्हे (Cyber ​Crime) काही थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच आता पुन्हा एकदा एका पन्नास वर्षीय व्यक्तीची युट्युब लाईकच्या नावाखाली तब्बल ९ लाख ४३ हजार ४०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे….

- Advertisement -

Devendra Fadnavis : “त्यांनी डोळ्याला…”; आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर

याबाबत कचेश्वर केरूजी काळंगे पाटील (वय ५०, रा. गुरुनगर, म्हसोबा मंदिर, जयाबाई कॉलनी, नाशिक रोड, नाशिक) यांनी सायबर पोलीस ठाण्यात (Cyber ​​Police Station)फिर्याद दाखल केली आहे. काळंगे पाटील यांची व्हाट्सॲप आयडीधारक तसेच टेलिग्राम आयडी व आयसीआयसीआय बँक खाते व पंजाब नॅशनल बँक खातेधारक यांच्याकडून फसवणूक झाली. हा प्रकार ४ ते १० जुलै २०२३ दरम्यान घडला.

Aaditya Thackeray : “भाजपा महाराष्ट्रद्वेषी आहे हे…”; आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

त्यानंतर सर्व आरोपींनी (Accused) संगनमत करून काळंगे पाटील यांना युट्युब व्हिडिओ (YouTube video) लाईकच्या नावाखाली टेलिग्राम ॲपद्वारे टास्क देऊन अधिकच्या परताव्याचे आमिष दाखवत त्यांना वेळोवेळी वेगवेगळ्या पेटीएम आयडी व बँक खात्यावरून ९ लाख ४३ हजार ४०० रुपये भरण्यास लावून फसवणूक केली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

वाहनांचे नुकसान व जाळपोळ करणाऱ्यांची गय केली जाणार नाही; पालकमंत्र्यांचा इशारा

- Advertisment -

ताज्या बातम्या