धुळे – प्रतिनिधी dhule
बनावट पध्दतीने विशेष शिक्षक म्हणून कार्यरत राहून शासनाची तब्बल 1 कोटी 21 लाख 56 हजार 413 रूपयात फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
तत्कालीन टॉप टेन खासदार माणिकराव गावित यांचे निधन
याप्रकरणी एका संस्थेच्या तत्कालीन अध्यक्षासह जिल्ह्यात 7 विशेष शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.
जि.प.च्या माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी महेंद्र जोशी (वय 58 रा. संभाप्पा कॉलनी, चित्तोड रोड) यांनी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, धुळे येथील जय भवानी राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शांताराम गोटु बेहरे, सोनगीर येथील एन.जी. बागूल हायस्कूलचे विशेष शिक्षक हेमराज रविंद्र पाटील, देवपूरातील हाजी बबलु सरदार हायस्कूलचे विशेष शिक्षक उल्हास प्रकाश सुर्यवंशी, साक्री रोडवरील स्वामी टेऊराम हायस्कूलचे विशेष शिक्षक रणजीत झुंबरलाल पाटील, अर्थे बुद्रूक (ता.साक्री) येथील जि.प.शाळेचे विशेष शिक्षिका प्रतिभा दिनकर बेहरे, जखाणे (ता.शिंदखेडा) येथील विशेष शिक्षक संजय दिनकर बेहरे व जखाणेतील विद्यालयाचे विशेष शिक्षक अतूल संतोष मोरे यांनी केंद्र शासन पुरस्कृत अपंग एकात्मिक शिक्षण योजना (सन 2009 पुर्वीची) अंतर्गत पुर्व नियोजन करून इतरांच्या मदतीने बनावट दस्ताऐवजाच्या आधारे आजही शासनाच्या सेवेत बनावट पध्दतीने विशेष शिक्षक म्हणून कार्यरत राहून एकुण 1 कोटी 21 लाख 56 हजार 413 रूपय वेतन घेतले.
त्यापैकी नाशिक विभागाच्या शिक्षण उपसंचालकांकडील वेतन परत केल्याचे झाले. त्यानंतरही केवळ तीन विशेष शिक्षकांनी नाममात्र 2 लाख 182 रूपये परत सर्व सहा विशेष शिक्षकांनी व जय भवानी राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या तत्कालीन अध्यक्ष/ मुख्याध्यापकाने मिळून शासनाची एकुण 1 कोटी 21 लाख 56 हजार 413 रूपयात फसवणूक केली. तपास आर्थिक गुन्हे शाखेची एपीआय हेमंत बेंडाळे करीत आहेत.