Friday, May 3, 2024
Homeधुळेआवास योजनेच्या नावाखाली 30 हजार लाटले

आवास योजनेच्या नावाखाली 30 हजार लाटले

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घर बांधण्यासाठी अनुदान मिळावे याकरीता महापालिकेत अर्ज करुनही प्रकरण मंजुर होत नव्हते.

- Advertisement -

मात्र महापालिकेतील संजय अग्रवाल यांनी याकामी एकदा 20 हजार तर दुसर्‍यांना पुन्हा 10 हजार रुपयांची मागणी केली.

हात उसने करुन त्यांना ही रक्कम दिल्यानंतर प्रकरण नामंजूर झाल्याने आपली फसगत झाली आहे, अशी तक्रार शहरातील यशवंत नगरमध्ये राहणारे भिकुबाई दिगंबर चौधरी व विजय दिगंबर चौधरी यांनी केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राज्य महिला आयोग नगरविकास मंत्री जितेंद्र आव्हाड, आणि प्रधान सचिव व विभागीय आयुक्तांकडे रजिस्टर स्वरुपात ही तक्रार पाठविली आहे.

जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांनाही तक्रारीची प्रत रवाना करण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, आम्ही साक्री रोड लगतच्या ऐशवंत नगर भागात राहतो.

यशवंत को-ऑप सोसायटी अंतर्गत असलेली सुमारे 300 स्वेकअफुट जागा आमच्या मालकीची आहे. यावर सध्या कच्चे पत्र्याचे घर आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घर बांधण्यासाठी अडीच लाखरुपयांचे अनुदान देण्यात येते अशी माहिती आम्हाला मिळाली.

त्यानुसार महापालिकेच्या बांधकाम विभागात संपर्क साधला. 11 एप्रिल 2020 रोजी आवश्यक ती सर्व कागदपत्रे संबंधित विभागात जमा केली. त्यानंतर अनेकदा या विभागात चकरा मारल्या. मात्र उडवा उडवीची उत्तरे मिळालीत.

काहींनी आपल्याला या विभागातील संजय अग्रवाल याना भेटच्याचा सल्ला दिलया. त्यानुसार 11 जुलै 2019 रोजी श्री.अग्रवाल यांची प्रत्यक्ष भेट घेली असता त्यांनी पुन्हा कागदपत्रांची मागणी केली.

याशिवाय प्रकरण मंजुरीसाठी 20 हजार रुपयांचीही मागणी केली. आपण हात मजुरी करीत असून कौटुंबिक परिस्थिती बेताची असल्याची सांगूनही त्यांनी पैशाचा रेटा लावला.

अखेर नातेवाईकांच्या मदतीने 20 जुलै रोजी श्री. अग्रवाल यांना 20 हजार रुपये दिलेत. त्यानंतरही मनपात व त्याच्ंयाकडे वारंवार चकरा मारल्या. त्यांनी पुन्हा दहा हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार नोव्हेंबर 2019 रोजी त्यांना दहा हजार रुपये देण्यात आले. तरीही प्रकरण मंजुर होवू शकले नाही. श्री.अग्रवाल यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे झालेल्या संभाषणाची रेकॉर्डींग देखील आपल्याकडे आहे.

त्यांनी दबाव टाकून धमकी व ब्लॅकमेलींग करुन आमच्याकडून 30 हजार रुपये उकळलेत. मात्र प्रधानमंत्रही आवास योजनेंतर्गत आम्हला अनुदान मिळू शकले नाही.

परिणामी घर बांधता आले नाही. त्यामुळे श्री.अग्रवाल यांना दिलेले पैसे व्याजासह परत मिळावेत, अम्हाला न्याय मिळावा आणि या योजनेतंर्गत घरकुलासाठी अनुदान मिळावे अशी मागणी भिकुबाई चौधरी व विशाल चौधरी या तक्रार निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या