Wednesday, May 29, 2024
HomeUncategorized'ट्रू कॉलर' वापरून फसवणूक

‘ट्रू कॉलर’ वापरून फसवणूक

छत्रपती संभाजीनगर- Chhatrapati Sambhajinagar

ट्रू कॉलरवर (True Caller) पीएसआय (psi) असल्याचे भासवून एका दुकानदाराला ४६ हजार रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरातील सिडको परिसरात उघडकीस आला. याप्रकरणी अज्ञात मोबाईलधारकावर पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. काही तासात या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

- Advertisement -

सचिन बबनराव काळे (रा. पुंडलिकनगर) यांनी फिर्याद दिली. त्यांचे सिडको एन-४ परिसरात इलेक्ट्रिकचे दुकान आहे. आरोपी मोबाईलधारकाने त्यांच्या नंबरवर कॉल करून इन्वर्टर व बॅटरीबाबत चौकशी केली. ट्रू कॉलरवर चेक केले असता शिंदे साहेब एमआयडीसी वाळूज पोलीस स्टेशन असे नाव आले. त्यावरून हा व्यक्ती पीएस॒आय असावा काळे यांना वाटले. त्याने विश्‍वास संपादन करून दुकानातून १४ हजार ५०० रुपये किमतीची एक्साईड बॅटरी, १० हजार ८०० रुपयाची इन्व्हर्टर असा ४१ हजार ६०० रुपयांचे साहित्य उधारीवर घेतले. मात्र, त्यानंतर त्याचा फोन बंद आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सचिन काळे यांनी पुंडलिकनगर पोलिसात फिर्याद दिली. तपास पोलीस उपनिरीक्षक माळी हे करीत आहेत.

अन्‌ जाळ्यात अडकला

या प्रकरणाचा तपास करताना ज्ञानेश्वर नावाच्या व्यक्तीने ही फसवणूक केल्याचे समोर आले असून ज्ञानेश्‍वर हा गुन्ह्यातील माल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच गजानननगर भागात त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून बॅटरी, इन्व्हर्टर, ड्रिल मशीन, केबल वायर बंडल, प्लम्बिंगचे साहित्य, दरवाजा फिटिंगचे साहित्य असा २ लाख ४ हजार ७२ रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. 

- Advertisment -

ताज्या बातम्या