Thursday, September 19, 2024
HomeUncategorizedआनंद वार्ता : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अजिंठा लेणीत विनामुल्य प्रवेश!

आनंद वार्ता : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अजिंठा लेणीत विनामुल्य प्रवेश!

सोयगाव/पिंपळगाव हरे.ता.पाचोरा-वार्ताहार Ajanta Caves

- Advertisement -

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त शुक्रवार दि.५ ते स्वातंत्र्य दिना पर्यंत अजिंठ्याच्या लेणीत (Ajanta Caves) विनामुल्य प्रवेश दिला जाणार असल्याची घोषणा भारतीय पुरातत्व विभागाने केली असून शुक्रवारी पहिल्याच दिवशी विनामुल्य अजिंठा लेणीत प्रवेशाचा पर्यटकांनी लाभ घेतल्याने पर्यटकांच्या (tourists) चेहऱ्यावर हास्य फुलले होते.

स्वातंत्र्याचा ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत विनामुल्य प्रवेश देण्याचा निर्णय भारतीय पुरातत्व विभागाने घेतला आहे. त्यामुळे अजिंठा लेणीत मोफत भ्रमंती सुरु झालेली असून या निर्णयामुळे पर्यटकांच्या खिशाला बसणारा भुर्दंड कमी होणार असून जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत जाण्यासाठी आता दहा दिवस केवळ बसचे भाडेच लागणार असून अजिंठा लेणीचे तिकीट दहा दिवसांसाठी रद्द करण्यात आले आहे.

महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या (Maharashtra Tourism Department) वतीने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेणींमध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या वतीने शुक्रवारी विदेशी पर्यटकांना अजिंठा लेणीमध्ये मोफत प्रवेश देण्यात आला.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ निमित्त, ५ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट, 2022 या कालावधीत साइट तसेच सर्व पुरातत्व स्थळांचे संग्रहालय. एएसआयचे मेमोरियल-2 चे संचालक डॉ.एन.के.पाठक यांनी बुधवारी हा आदेश जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, 5 ऑगस्टपासून सर्व स्मारके, पुरातत्व स्थळे आणि संग्रहालये पर्यटकांसाठी पूर्णपणे मोफत केली जातील. या साइट्सवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. याबाबतचे आदेश सर्व प्रादेशिक संचालक व संबंधितांना पाठविण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या