Tuesday, November 19, 2024
HomeUncategorizedFriendship Day 2023 : बनें चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहें दोस्ताना...

Friendship Day 2023 : बनें चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहें दोस्ताना हमारा!

मैत्रीचा हा बंध हा आयुष्यातील सर्वात घट्ट बंधनांपैकी एक आहे. आपल्या कुटुंबाइतकेच आपल्या आयुष्यात खास स्थान असणार्‍या काही व्यक्ती म्हणजे आपले बेस्ट फ्रेंड्स. खरं तर ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा हा स्पेशल दिवस आज म्हणजेच ६ ऑगस्ट रोजी आला आहे. या खास दिवशी प्रत्येकजण आपल्या मित्र-मैत्रिणींना, जवळील सहकाऱ्यांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा देतो. त्यांच्यासोबत काही खास वेळ घालवून सेलिब्रेशन केले जातं.

पण फ्रेंडशिप डे साजरा करणाऱ्या लोकांच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की मित्रांसाठी खास दिवस साजरा करण्यामागचे कारण काय? ऑगस्टच्या पहिल्या रविवारीच का साजरा केला जातो फ्रेंडशिप डे? पहिल्यांदा फ्रेंडशिप डे कधी आणि का साजरा करण्यात आला? फ्रेंडशिप डेचा इतिहास काय आहे? (history of friendship day) आणि या दिवसाचे महत्त्व काय आहे? (Importance of friendship day) ६ ऑगस्ट २०२३ रोजी मैत्री दिन साजरा करण्यापूर्वी, या दिवसाचा इतिहास आणि फ्रेंडशिप डेशी संबंधित मनोरंजक गोष्टी जाणून घेऊया.

- Advertisement -

असं म्हणतात की, फ्रेंडशिप डे ची सुरुवात ही जगातील सर्वात मोठ्या युद्धात दडली आहे. पहिल्या महायुद्धानंतर अनेक देशांमध्ये आपपसात द्वेष, शत्रुत्व आणि असंतोषाच्या भावना निर्माण झाली. ही भावना संपवण्यासाठी १९३५ मध्ये अमेरिकेच्या सरकारने फ्रेंडशिप डे ची सुरुवात केली. त्यावेळी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जाईल असे ठरवण्यात आले. या मागचे प्रमुख कारण म्हणजे रविवारी बहुतांश लोकांना सुट्टी असते. त्यामुळे लोक एकत्रित येऊन हा दिवस साजरा करु शकतात.

तर दुसरीकडे असे म्हटले जाते की, १९३५ मध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी अमेरिकन सरकारने एका निर्दोष व्यक्तीचा जीव घेतला होता. त्या व्यक्तीला मारल्यानंतर त्याच्या मित्राने त्याच्या आठवणीत आत्महत्या केली होती. यानंतर दक्षिण आफ्रिकी लोकांनी हा दिवस International Friendship Day म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव अमेरिकन सरकार समोर ठेवला. त्या निर्दोष व्यक्तीचा जीन घेतल्याने जनता संतापली होती. त्यामुळे अमेरिकन सरकारने तब्बल २१ वर्षांनी १९५८ मध्ये तो प्रस्ताव मंजूर केला.

त्याशिवाय १९३० मध्ये एका व्यापाऱ्याने फ्रेंडशिप डे ची सुरुवात केली. जोएस हाल असे या व्यापाराचे नाव आहे. जगभरातील सर्व लोकांप्रमाणे मित्रांसाठीही एक खास दिवस असावा या कारणाने या व्यापाराने फ्रेंडशिप डेची सुरुवात केली. त्यावेळी त्या व्यापाऱ्याने 2२ऑगस्ट हा दिवस फ्रेंडशिप डे म्हणून निवडला. त्यानंतर युरोप आणि आशिया यासारख्या बहुतांश देशात या परंपरेला पुढे नेत फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. तसेच दक्षिण अमेरिकेतील पेराग्वेमधील डॉक्टर रमन आर्टिमियो यांनी २० जुलै १९५८ रोजी एका डिनर पार्टीदरम्यान मित्रांसाठी खास दिवस असावा अशी घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर फ्रेंडशिप डे ची सुरुवात झाली. तसेच ही परंपरा कायम रहावी याचीही काळजी घेण्यात आली.

फ्रेंडशिप डे हा मित्र-मैत्रिणींना समर्पित करणारा दिवस असतो. मैत्रीविषयी प्रेम अन् जिव्हाळा व्यक्त करणारा हा दिवस असतो. आपल्या आयुष्यातील मैत्रीचे महत्त्व पटवून देणारा हा दिवस असतो. एकमेकांप्रति प्रेम, आपुलकी, बंधुता वाढावी, यासाठी जगभरात ‘फ्रेंडशिप डे’ दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. अनेकांच्या आयुष्यात मैत्रीचे स्थान हे सर्वोच्च असते. म्हणूनच ते म्हणतात, ‘बनें चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहें दोस्ताना हमारा!’

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या